

नारायणगाव, ता. २७ : नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठ्यामुळे अभावी पाण्याअभावी नवीन इमारतीच्या बांधकामे, वेल्डिंग, बँकिंग, शेतीच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.
नारायणगाव परिसरात रविवारी (ता.२६) मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर वीज पुरवठा खंडित होता. खंडित वीजपुरवठ्यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला. पाण्याअभावी नवीन इमारतीचे बांधकामे व वेल्डिंगची कामे ठप्प झाली. पतसंस्था, बँकाचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार बंद झाले. विजेअभावी पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकाच्या फवारणीचे नियोजन कोलमडले.
दरम्यान, उपकेंद्रातील ब्रेकर नादुरुस्त झाला आहे. लक्ष्मी थिएटर जवळील फिडरमध्ये दोष निर्माण झाला होता. दोष सापडण्यास उशीर झाल्याने फिडर बंद ठेवावे लागले. नारायणवाडी येथील रोहित्र नादुरुस्त झाले आहे, असे महावितरणचे अभियंता आर. एन. बनकर यांनी सांगितले.
85514
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.