जुन्नर मतदारसंघात १३ हजार मतदारांची वाढ

जुन्नर मतदारसंघात १३ हजार मतदारांची वाढ

नारायणगाव, ता. १२ ः जुन्नर विधानसभा मतदारसंघात तीन लाख १२ हजार २०५ मतदार असून, यापैकी एक लाख ५२ हजार ३७१ महिला मतदार आहेत. ज्येष्ठ व अतिजेष्ठ (६० ते १०९ वयोगट) मतदारांची संख्या ७१ हजार ९५७ आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जुन्नर विधानसभा मतदारसंघात दोन लाख ९८ हजार ८४८ मतदार होते. मागील पाच वर्षात मतदारांच्या संख्येत १३ हजार ३५७ मतदारांची वाढ झाल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार सुधीर वाघमारे यांनी दिली.
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ३५६ मतदान केंद्र तयार करण्यात आली असून, रविवारी (ता. १२) दुपारी मतदान अधिकारी व कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्रावर रवाना झाले. सोमवारी (ता. १३) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजवावा यासाठी मतदार जागृती करण्यात आली. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बिबट्यांपासून सावधानता बाळगा...
जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे मानव व पाळीव जनावरांवर हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मुक्कामी गेलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी बिबट प्राण्यांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन घोड प्रकल्प, वनविभाग जुन्नरच्या वतीने करण्यात आले.

जुन्नर : मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना होताना कर्मचारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com