गुंजाळवाडी परिसरात 
बिबट्याची दहशत

गुंजाळवाडी परिसरात बिबट्याची दहशत

नारायणगाव, ता. १२ ः गुंजाळवाडी परिसरात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले वाढले असून, या भागात दोन बिबटे फिरत असल्याने त्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या वतीने गुंजाळवाडी येथे रविवारी (ता. १२) सकाळी पिंजरा लावण्यात आला, अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.
रविवारी पहाटेच्या सुमारास गुंजाळवाडी येथील अशोक दरेकर व ओंकार दरेकर यांच्या घराच्याजवळ दोन बिबटे जोडीने फिरत असल्याचे दिसून आले. या भागात असणारे उसाचे व उन्हाळी बाजरीचे क्षेत्र याचा विचार करता, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात पिंजरा लावण्यात आला. नागरिकांनी रात्रीच्यावेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. लहान मुलांना एकटे सोडू नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com