भाडेकरूंची माहिती न दिल्याने गुन्हा दाखल

भाडेकरूंची माहिती न दिल्याने गुन्हा दाखल

नारायणगाव, ता. २ : भाडेकरूंची माहिती न दिल्याने वारूळवाडी येथील गणेश खंडू डोके (वय ४२, रा. अभंग वस्ती, वारूळवाडी, ता. जुन्नर) यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

दरम्यान, घरमालकांनी भाडेकरार करून भाडेकरूंची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन शेलार यांनी केले आहे. गणेश डोके यांनी वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अभंग वस्ती येथे इतर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या पाच जणांना पाच खोल्या भाड्याने दिल्या होत्या. हे भाडेकरू दोन वर्षापासून या ठिकाणी राहत होते. या भाडेकरूंबाबत त्यांनी नारायणगाव पोलिस ठाण्याला माहिती दिली नव्हती.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार घरमालकाने भाडेकरूंची माहिती संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यास देणे बंधनकारक आहे. याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्याच्यावतीने आवाहनही करण्यात आले होते. मात्र याकडे गणेश डोके यांनी दुर्लक्ष करून आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत पोलिस कर्मचारी दत्तात्रेय सोपान ढेंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बांधकाम, शेती, रंगकाम, फर्निचर, व्यापार आदी कामांसाठी बाहेरील जिल्ह्यासह इतर राज्यातील व बांगलादेशी नागरिक ग्रामीण भागात रोजगारासाठी स्थलांतरित झाले आहेत. ते भाड्याने खोल्या घेऊन राहतात. गुन्हा घडल्यानंतर हे नागरिक आपल्या राज्यात फरार होतात. घरमालकांनी भाडेकरूंबाबत पोलिस ठाण्याला माहिती दिल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आदींच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सोपे होते. वारंवार आवाहन करून सुद्धा घरमालक भाडेकरूंची माहिती देत नाहीत. यामुळे नारायणगाव पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
- महादेव शेलार, साहाय्यक पोलिस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com