पोलिस बंदोबस्तात भाजीपाल्याचे लिलाव

पोलिस बंदोबस्तात भाजीपाल्याचे लिलाव

नारायणगाव, ता. २ : कोथिंबीर, मेथी, शेपूच्या बाजारभावात वाढ झाल्याने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजारात या भाजीपाल्याच्या जुड्या तरुणांच्या काही टोळ्या चोरून नेतात. या मुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अरेरावी करणाऱ्या या फुकट्या, भुरट्या चोरांना आवरणे बाजार समितीच्या प्रशासनाच्या हाताबाहेर गेले आहे. या मुळे लिलावादरम्यान रोज रात्री पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गालगत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाजीपाला उपबाजार आहे. या आवारात रोज सायंकाळी सात ते नऊ दरम्यान कोथंबीर, मेथी, शेपूचे लिलाव होतात. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर भागातील शेतकरी येथील उपबाजारात सायंकाळी जुड्या विक्रीसाठी घेऊन येतात. जुड्यांचे ढीग लिलावासाठी उपबाजार आवारात टाकले जातात. मागील दहा ते पंधरा दिवसापासून कोथंबीर, मेथी, शेपूच्या बाजारभावात वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत जुडीला शेकडा अनुक्रमे १२०१- ६५०१, १००१- ३८०१, २४०१-५२०१ याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. बाजारभावात वाढ झाल्याने भुरटे चोर रात्री उपबाजारात येऊन शेतकऱ्यांनी लिलावासाठी ठेवलेल्या ढिगावरून जुड्यांची चोरी करतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शेतकऱ्यांनी अथवा बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यास हे चोरटे तरुण आरेरावी करतात. भाजीपाला चोरीमध्ये काही महिलांचा सहभाग आहे.

चोरीच्या प्रकारांमुळे पोलिस ठाण्यात तक्रार
नारायणगाव उपबाजारात तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली होती. याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या जुड्या हे तरुण परिसरातील भाजी पाला, पावभाजी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांना करतात. चोरीच्या प्रकार वाढल्याने याबाबतची तक्रार जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्याकडे दिली.


बाजार समितीच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली आहे. लिलावा दरम्यान रोज रात्री सात ते दहाच्या दरम्यान येथील उपबाजार आवारात पोलिस बंदोबस्त दिला आहे. नारायणगाव पोलिस ठाण्याचे शासकीय वाहन व पोलिस, ग्राम सुरक्षा दलाचे जवान उपबाजार आवारात फिरत असतात. भाजीपाला चोरणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. भाजीपाला चोरीला पाय बंद बसला आहे.
- महादेव शेलार, सहाय्यक पोलिस निरीक्षक

05105

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com