प्ररप्रांतीय तरुणाचा
नारायणगावात खून

प्ररप्रांतीय तरुणाचा नारायणगावात खून

नारायणगाव, ता. ४ : छत्तीसगड येथून जुन्नर तालुक्यात मजुरीसाठी आलेल्या श्याम मरकाम (वय २६, रा. बिजराकामकला, ता. मुंगेर, छत्तीसगड) या तरुणाचा खून झाला आहे. मित्रानेच गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
श्याम मरकाम व त्याचे तीन मित्र मजुरीसाठी जुन्नर तालुक्यात आले होते. दोन दिवसांपासून ते वारूळवाडी येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते. गुरुवारी (ता. ४) सकाळी नऊ ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्याम मरकाम याचा राहत्या घरात खून करण्यात आला. त्यानंतर तीनपैकी त्याचे दोन सहकारी मित्र फरारी झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com