राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची 
प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

Published on

नारायणगाव, ता. १० : ‘‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुविद्याशाखीय शिक्षण, अभ्यासक्रमातील लवचिकता, शाश्वत विकास अशा मूलभूत बाबींचा समावेश आहे. यामुळे भारताला ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे’’, असे मत नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ संचालित आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० स्कूल कनेक्ट’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत डॉ. कुलकर्णी यांनी ‘स्कूल कनेक्ट’ अभियानाची उद्दिष्टे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये या बाबत मार्गदर्शन केले. तसेच या धोरणातील बारकावे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना समजावले. यावेळी जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आकृतिबंध स्पष्ट केला. या वेळी जयहिंद शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, प्रा. आर. एल. मानकर, प्राचार्य सुभाष आंद्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आर. एम. मुळजकर, प्रा. वाल्मीक घोलप यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर. ए. गाडेकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.