

नारायणगाव, ता. १५ : वारूळवाडी (ता. जुन्नर) येथे भरवस्तीत येऊन बिबट्याने पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला. ही घटना रविवारी (ता. जुन्नर) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. भरवस्तीत बिबट्या येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी भेट दिली. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी वारूळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
वारूळवाडी येथे सुरेश वारुळे यांचे पिठाच्या चक्कीचे दुकान आहे. या दुकानासमोर दोन पाळीव कुत्रे होते. बिबट्याने यापैकी एकास पहाटेच्या सुमारास उचलून नेला. वारूळवाडी, अभंग वस्ती, सबनीस विद्यालय परिसर या भागात मागील तीन महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. या भागात चार ते पाच बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकत नसल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, अभंग वस्ती येथील माजी सैनिक अवचट
यांच्या शेतातील गिन्नी गवतात शनिवारी दुपारी कामगारांना बिबट्या आढळून आला. या बिबट्याचे छायाचित्र कामगारांनी टिपले आहे.या भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्या बरोबर त्यांचे तीन ते चार महिन्याचे बछडे फिरताना शेतकऱ्यांना दिसत आहेत.
05512
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.