नारायणगाव येथे गुरुवर्य रा. प. सबनीस यांना आदरांजली

नारायणगाव येथे गुरुवर्य रा. प. सबनीस यांना आदरांजली

Published on

नारायणगाव, ता. ९ : ‘‘ग्रामोन्नती मंडळाचे संस्थापक गुरुवर्य रा. प. सबनीस हे महात्मा गांधीजींच्या विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्थापन केलेली ग्रामोन्नती मंडळ ही शैक्षणिक संस्था ग्राम उन्नतीचे उत्तम केंद्र झाले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर विकसित राष्ट्र म्हणून आपण भारताला पुढे नेऊया,’’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता व हमी कक्षाचे संचालक
डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले.
गुरुवर्य रा. प. सबनीस यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक, समाधी पूजन, प्रसाद वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गुरुवर्य रा. प. सबनीस यांच्या समाधीचे पूजन डॉ. संजय ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर वसंत व्हिला सभागृहात आयोजित आदरांजली सभेत डॉ. ढोले बोलत होते. याप्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, डॉ. आनंद कुलकर्णी, अरविंद मेहेर, सोमजी पटेल, तानाजी वारुळे, आल्हाद खैरे, रत्नदीप भरवीरकर, डॉ. संदीप डोळे, एकनाथ शेटे, ऋषिकेश मेहेर, देवेंद्र बनकर, नीलेश पाटे, देविदास भुजबळ, सुखदेव बनकर, प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, मुख्याध्यापक सतीश तंवर, उपप्राचार्य हनुमंत काळे आदी उपस्थित होते.
ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष मेहेर म्हणाले, ‘‘गुरुवर्य सबनीस यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले. ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेने केंब्रिज, बँकॉक व थायलंड विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न चालविले आहेत.’’
यावेळी माजी विद्यार्थी गेनू खानदेशे, डॉ. अभय खानदेशे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी प्राध्यापक मारुती बनकर यांनी संस्थेला तीन लाख ११ हजार रुपयाची देणगी दिली. याप्रसंगी गेनू खानदेशे, शिक्षिका पल्लवी ढवळे, विद्यार्थी सई महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सतीश तंवर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद कसबे यांनी पाहुण्यांचा परिचय केला. सुनील ढवळे, प्रा. रमेश शेटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह पारगावकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com