

नारायणगाव, ता. ७ : थोर स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांच्या १२५व्या जयंती निमित्ताने नगदवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘श्यामची आई’ पुस्तकावर व साने गुरुजींच्या जीवनपटावर आधारित १०० गुणांची संस्कार परीक्षा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, साने गुरुजींचे संस्कार या माध्यमातून विद्यार्थ्यांवर व्हावेत. या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीणचे संचालक मंगेश मेहेर यांनी दिली.
या परीक्षेत चौथी ते सातवीतील साठ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न होते. विद्यार्थ्यांनी श्यामची आई या पुस्तकाचे वाचन करून व साने गुरुजी यांच्या जीवनपटाची माहिती घेऊन पूर्ण तयारीनिशी परीक्षा दिल्याने परीक्षेत सर्व विद्यार्थी यशस्वी झाले. प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक सखाराम शेंडकर, शिक्षक विद्या वाघ, मंगेश मेहेर, सुप्रिया अभंग, पंडित चौगुले, आशा आरेकर, उज्वला कांबळे, नीलेश शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबईचे अध्यक्ष श्यामराव कराळे, कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील, कार्यवाह सुनील पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब घोडे, कोषाध्यक्ष संतोष गडगे, कार्यवाह चांगदेव पडवळ, सल्लागार रमेश तांबे, मार्गदर्शक संजय डुंबरे यांनी या परीक्षेचे आयोजन व नियोजन केले.
या स्तुत्य उपक्रमाबाबत गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख अशोक हांडे पालक, ग्रामस्थ यांनी आयोजकांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.