सोन्यासारखा माल असूनही बाजारभाव मातीमोल

सोन्यासारखा माल असूनही बाजारभाव मातीमोल
Published on

नारायणगाव, ता.१८ : मागील दीड महिन्यापासून टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने जुन्नर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन लाख रुपयांच्या भांडवली खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात टोमॅटोला प्रतिकिलोग्रॅम पाच ते दहा रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे.

शेतकऱ्यांचा मिळणाऱ्या बाजारभावातून जेमतेम वाहतूक खर्च, तोडणी मजुरी वसूल होत आहे. यामुळे भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. माल सोन्यासारखा मात्र बाजारभाव मातीमोल अशी प्रतिक्रिया टोमॅटो उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. रब्बी हंगामात लागवड केलेल्या टोमॅटोचा तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. टोमॅटो तोडणी सुरू होताच
टोमॅटो क्रेटला प्रतवारीनुसार सत्तर रुपये ते दोनशे रुपयांच्या दरम्यान मातीमोल बाजारभाव मिळाला आहे. येथील टोमॅटो उपबाजारात सद्यस्थितीत जुन्नर, आंबेगावसह शिरूर, बारामती, इंदापूर, बीड, पारनेर या भागातून रोज चार ते पाच हजार टोमॅटो क्रेटची आवक होत आहे.

तोडणी, मजुरी खर्च अधिक
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातून टोमॅटो विक्रीसाठी आणण्यास वाहतूक खर्च प्रतिक्रेट २५ ते ३० रुपये, तोडणी मजुरी २५ रुपये तर बारामती, इंदापूर,बीड, पारनेर या भागातील शेतकऱ्यांना वाहतूक खर्च प्रतिक्रेट ५० ते ७० रुपये, तोडणी मजुरी २५ रुपये असा खर्च होतो. उपबाजारात टोमॅटो विक्री आणण्यासाठी वाहतूक व तोडणी मजुरीसाठी पन्नास रुपये ते शंभर रुपयांच्या दरम्यान खर्च होतो. यामुळे रब्बी हंगामातील टोमॅटो उत्पादकांना एकरी सुमारे दीड लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

आठ एकर क्षेत्रातील टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू आहे. लागवड ते काढणी दरम्यान रोप, मशागत, मांडव उभारणी, ड्रिप, शेणखत, रासायनिक खते, कीटक व बुरशीनाशके आदींसाठी सोळा लाख (एकरी दोन लाख रुपये) रुपयांचा भांडवली खर्च झाला आहे. सध्याच्या बाजारभावात जेमतेम वाहतूक व तोडणी मजुरी वसूल होत आहे. बाजाराभावाअभावी १८ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.
- श्रीरंग दाते, टोमॅटो उत्पादक शेतकरी, ओतूर
06249

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com