आंबेडकर जयंतीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

आंबेडकर जयंतीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
Published on

नारायणगाव, ता. १५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आणि डिसेंट फाउंडेशन यांच्या वतीने नारायणगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. १४) एसटी बस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात चालक, वाहक व इतर कर्मचारी अशा एकूण ३५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बिंबाजी वाव्हळ यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई होते. यावेळी उपसरपंच योगेश पाटे, लायन्स क्लब ऑफ नारायणगावचे अध्यक्ष राजेंद्रकुमार देसाई, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. दीप्ती कळमकर, अरविंद मेहेर, सदाशिव भोसले, विजय शिंदे, विठ्ठल औटी, दत्ता शेटे, विलास पाटे, एस. टी. आगार व्यवस्थापक वसंत अरगडे, सहाय्यक व्यवस्थापक तुकाराम पवळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र रणदिवे, खजिनदार उमेश वाघांबरे, संदीप खळे, संजय रणदिवे, अमोल गायकवाड, संकेत क्षीरसागर, फकीर आतार, आदिनाथ चव्हाण, अविनाश रणदिवे, अक्षय वाव्हळ आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. पंकज वाव्हळ, डॉ. अमेय डोके, डॉ. दयानंद गायकवाड, प्रकाश पाटील, आर. झुनझुनवाला, मंगेश साळवे, डॉ. मिलिंद घोरपडे, डॉ. मृणाल ठाकूर, डॉ. हाशमी शेख, डॉ. सकीना शेख, डॉ. महेश नवले, डॉ. अभिषेक खाडे यांनी रुग्णांच्या तपासणी केली. रवींद्र तोरणे यांनी सूत्रसंचालन केले, तर गणेश वाव्हळ यांनी आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com