वारुळवाडीत महिलेचे
मंगळसूत्र हिसकावले

वारुळवाडीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

Published on

नारायणगाव, ता. १५ : दुचाकीवरून पती समवेत घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रातील सुमारे एक तोळे वजनाचे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वारूळवाडी येथील वृंदावन पार्क सोसायटीजवळ घडली.
याबाबतची तक्रार ममता सतीश तंवर (वय ५४, रा. वारूळवाडी) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली. ममता तंवर यांनी नारायणगाव येथील मीनथडी जत्रेत भेळ विक्रीचा स्टॉल लावला होता. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्या पती सतीश तंवर यांच्यासमवेत दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. हेल्मेट घालून मोटारसायकलवर आलेल्या तरुणाने वारूळवाडी येथील सुयोग सोसायटीजवळ त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसका मारला. यामुळे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र तुटले. यापैकी मंगळसूत्रातील एक तोळा सोने घेऊन चोरटा अंधाराचा गैरफायदा घेऊन पसार झाला. याही अवस्थेत सतीश तंवर यांनी चोरट्याचा दुचाकीवर पाठलाग केला. मात्र, चोरटा पसार झाला. नारायणगाव परिसरामध्ये महिलांचे दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मागील आठवड्यात साळवाडी येथील पूजा राहुल चव्हाण या महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळा वजनाचे मंगळसूत्र नारायणगाव बसस्थानक आवारातून अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com