नारायणगावात घोषणांनी दुमदुमला परिसर
नारायणगाव, ता.१८: पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचे सिंदूर मिशनअंतर्गत भारतीय लष्कराने चोख प्रतिउत्तर देऊन पाकिस्तानमध्ये असलेले नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय सैनिकांच्या या अभिमानास्पद कामगिरीला पाठिंबा देण्यासाठी नारायणगाव येथे रविवारी (ता.१८) सकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावचेळी भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता
भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष आशिष माळवदकर, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे नामदेव खैरे, डॉ. संदीप डोळे, सेवानिवृत्त लेफ्टनंट उमेश अवचट, उपसरपंच योगेश पाटे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांच्या नेतृत्वाखाली या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी मंदिरापासून सकाळी साडेनऊ वाजता तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली. मावळे आळी, पेठ आळी, हनुमान चौक, शिवाजी चौक, बाजारपेठ मार्गे तिरंगा रॅली काढण्यात आली होती. ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचे नागरिकांनी उस्फुर्त स्वागत केले. येथील पूर्ववेशीजवळ तिरंगा रॅली आल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तिरंगा फडकावून तालुक्यातील सर्व हिंदू संघटना, माजी सैनिक, गुरुवर्य रा.प. सबनीस विद्या मंदिरातील छात्र सैनिक, स्काऊट गाइड चे विद्यार्थी, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. बसस्थानक चौकात तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत भाजप नेत्या आशा बुचके, उमेश अवचट, योगेश पाटे,नामदेव खैरे, माजी उपसरपंच संतोष वाजगे यांनी मनोगत व्यक्त करून भारतीय सैन्य दलाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
तिरंगा यात्रेचे नियोजन प्रशांत खैरे, नयन खैरे,अमित औटी, शिवनेरी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ वाजगे, अक्षय खैरे आनंद भास्कर अक्षय डोके, अक्षय खैरे, अनघा जोशी यांनी केले. या वेळी अनिल दिवटे, माजी सैनिक शिवाजी पाटे, संभाजी वाळुज, किसन ढवळे,डी. के. भुजबळ,माजी उपसरपंच संतोष वाजगे, विकास दरेकर, अनिल दिवटे, माजी सरपंच अशोक पाटे, राजाराम थोरवे, सुभाष काकडे आदी मान्यवर व्यापारी असोसिएशन, रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
06625
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.