‘कुकडी’च्या साठ्यात
०.७८५ टीएमसी वाढ

‘कुकडी’च्या साठ्यात ०.७८५ टीएमसी वाढ

Published on

नारायणगाव, ता. २७ : कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे कुकडी प्रकल्पअंतर्गत धरणाच्या पाणीसाठ्यात ०.७८५ टीएमसी (७८५ दशलक्ष घनफूट) वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात कुकडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची ही पहिलीच घटना आहे. कुकडी प्रकल्पात आजअखेर २.७६७ टीएमसी (९.३३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
जुन्नर तालुक्यात सात मेपासून ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन न झाल्याने व मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष वेलींवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन उन्हाळ्यात प्रथमच ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जुन्नर तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने सुरू केले आहेत.
कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील चार ते पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे. सात मेपासून आज सकाळी सहा वाजेपर्यंत कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी २८५ मिलिमीटर पाऊस झाला असून कुकडीच्या पाणी साठ्यात एकूण ०.७८५ टीएमसी वाढ झाली आहे.
यापैकी सर्वात जास्त ३८५ मिलिमीटर पाऊस डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात झाल्याने डिंभे धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात एकूण ०.५७८ टीएमसी वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात कुकडी प्रकल्पाच्या पाण्यासाठी वाढ होण्याची ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली.

मागील २४ तासात कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस मिलिमीटर (कंसात पाणी साठ्यात झालेली वाढ दशलक्ष घनफूट) : वडज : ६० (२९.९८), माणिकडोह : ३० (७४.४१) पिंपळगाव जोगे : १८ (४४.७२), डिंभे : ५० (४०७.७४), चिल्हेवाडी : १३(२५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com