‘फळबागा उत्पादन’ परीक्षेत पवार राज्यात प्रथम
नारायणगाव, ता.५ : नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने २०२३ - २४ मध्ये घेतलेल्या फळबागा उत्पादन पदविका परीक्षेमध्ये नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ संचलित मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील सुरेखा रंगनाथ पवार यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला, अशी माहिती डॉ. सत्यवान थोरात यांनी दिली.
विद्यापीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील ऑडिटोरियम हॉलमध्ये पारितोषिक वितरण समारंभ झाला. या वेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सुरेखा रंगनाथ पवार यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी विद्यापीठाचे डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भट्टूप्रसाद पाटील आदि उपस्थित होते.
सुरेखा रंगनाथ पवार या प्रगतशील शेतकरी आहेत. निमोणे (ता.शिरूर) येथे त्यांनी आधुनिक पद्धतीने केशर व हापूस आंब्याची फळबाग लागवड केली आहे. सुरेखा पवार म्हणाल्या की, पती यशवंत काळे यांचे प्रोत्साहन व शिक्षक डॉ. सत्यवान थोरात, डॉ. मिलिंद भुजबळ, प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांचे मार्गदर्शनामुळे यश मिळाले आहे.
ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे यांनी मार्गदर्शक शिक्षक आदींनी सुरेखा पवार यांचे अभिनंदन केले.
06811
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.