कुकडी प्रकल्पांतर्गत ४०.५१ टक्के साठा
नारायणगाव, ता. ६: कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात १२.०२ टीएमसी (४०.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी हा अखेर प्रकल्पात १.६६ टीएमसी (५.६२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. तुलनात्मक दृष्ट्या गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कुकडी प्रकल्पात १०.३६ टीएमसी (३४.८९ टक्के) जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत वडज, येडगाव, डिंभे धरणात ५० टक्के पेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. वडजधरणात ७१.१६ टक्के, येडगाव धरणात ८४.२५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पाण्याचा येवा विचारात घेता पूरनियंत्रणासाठी येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात एक हजार क्यूसेकने पाणी सोडले आहे. मागील अनेक वर्षाचा आढावा घेतल्यास यावर्षी प्रथमच जून महिन्यात कुकडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
धरण निहाय कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्के) : येडगाव : १.६३८ (८४.२५), माणिकडोह :२.०७९ (२०.४३), वडज : ०.८३४ (७१.१६), डिंभे : ६.९७ (५५.८१), पिंपळगाव जोगे : ०.४९६(१२.७७), चिल्हेवाडी:०.६३२(७८.७८).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.