किडींमुळे द्राक्षाच्या घड निर्मितीत अडथळा
नारायणगाव, ता. १२: मागील दोन महिन्यांपासून सतत पाऊस सुरू आहे. सूर्यप्रकाशाचा अभाव ढगाळ हवामान वातावरणातील आद्रता यामुळे द्राक्ष काडी पक्वता व सूक्ष्म घड निर्मितीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच प्रामुख्याने डाऊनी, भुरी व करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव द्राक्ष वेलींवर दिसून येत आहे. द्राक्ष उत्पादकांनी वेळीच खते व बुरशी, कीटकजन्य औषधे फवारणी आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असा सल्ला द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अजयकुमार उपाध्याय यांनी दिला आहे.
कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभाग यांच्या वतीने केव्हीके व द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांचा जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष बाग प्रक्षेत्र भेट दौरा केला. त्या नंतर केव्हीके मध्ये आयोजित चर्चासात्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी केव्हीकेचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष सुरेश कडलक, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, पुणे विभागाचे माजी अध्यक्ष भारत शिंदे, मानद सचिव गणेश सांगळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.प्रशांत शेटे, डॉ.दत्तात्रेय गावडे, संचालक राहुल दंडवते, नवनाथ सायकर, जायशिंग वायकर, सुहास थोरात, जितेंद्र बिडवई, संदीप वारुळे, राहुल शेटे, गुलाबराव नेहेरकर, प्रकाश वाघ, भानुदास लेंडे, राहुल बनकर, संजय कानडे, आदिनाथ चव्हाण, वैभव शिंदे आदी मान्यवर व द्राक्ष बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.नारायणगाव केव्हिके व द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी द्राक्ष बागायतदार ऋषिकेश मेहेर, राहुल बनकर यांच्या बागेची पाहणी केली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.उपाध्याय म्हणाले द्राक्ष काडीची पक्वता, वेलींची वाढ व पानांच्या पोषनासाठी पोटॅशियम प्रतिलिटर पाण्यात (१ ग्रॅम), मँग्नेशियम (४ ते ५ ग्रॅम), कॅल्शिअम (१ ग्रॅम) घेऊन फवारणी करावी. तसेच प्रतिलिटर पाण्यात युरिया (१ ग्रॅम), झिंक सल्फेट (०.५ ग्रॅम) घेऊन गरजेनुसार २ ते ३ फवारण्या कराव्यात.
द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. होळकर म्हणाले की, बुरजीजन्य व जीवाणू जन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड (२.५ ग्रॅम), कासुमाईट ( २ ग्रॅम) तसेच कार्बेंडेंझिम+ मँकोझेब ( २ ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात घेऊन आलटून, पालटून फवारणी करावी.
राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कडलक यांनी प्रास्ताविक तर आभार डॉ.दत्तात्रेय गावडे यांनी मानले.
पावसाळी हंगामात एकात्मिक अन्न व्यवस्थापन व रोग कीड व्यवस्थापन फायदेशीर ठरते. प्रामुख्याने जैविक खते व बुरशिनाशकांचा वापर जास्तीत जास्त करावा. कृषी विज्ञान केंद्रात जैविक उत्पादने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या नारायणगाव येथील डेपो मध्ये सूक्ष्म अन्न द्रव्य व रासायनिक खते उपलब्ध आहोत.
- कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष, केव्हीके, नारायणगाव
06848
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.