अपयशाने खचून न जाता स्वतःचे सल्लागार बना
नारायणगाव, ता. १५ : यशस्वी उद्योजक हा खडतर प्रवास आहे. त्यासाठी विविध कौशल्य आत्मसात करावी लागतात. विद्यार्थ्यांना उद्योजक व्हायचं असेल तर आपली आवड, कौशल्य, उद्योगाची निवड, बाजारपेठ, व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, साहस आदींची सांगड घालता आली पाहिजे. नोकरी व उद्योग यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. अपयशाने खचून न जाता स्वतःचे सल्लागार बना आणि यशस्वी उद्योजकाकडे वाटचाल करा, असा सल्ला ‘परिवार’ उद्योग समूहाचे संस्थापक संदीप नाईक यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व उद्योगजगताचा अनुभव, कौशल्य विकास व रोजगारक्षमतेचे महत्त्व’ याबाबत जागृती व्हावी या उद्देशाने इंटर्नशिप कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर होते. या वेळी ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे विश्वस्त प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यशाळेत १२५ विद्यार्थी व ५० उद्योजकांनी सहभाग नोंदवला. उद्योजक संदीप नाईक, वैभव पोखरकर, प्रवीण शेळके, श्यामराव थोरात यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उद्योजक राजकुमार माशालकर, दिलदीपसिंग बांगा, किरण वाघमारे, सुजित बांगर, धनाजी बोरकर, नंदकुमार चिंचकर, प्रशांत इचके, हर्षल शिंदे, सुभाष वाव्हळ, डॉ. उत्तम घोरपडे, सनी भोर, प्रा. सचिन कसबे, प्रा. अनिल पडवळ, पंकज कोऱ्हाळे यांनी अनुभव कथन केले. सूत्रसंचालन प डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी केले. प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. दिनेश गाजुलवार यांनी आभार मानले.
अनिल मेहेर म्हणाले, उच्च शिक्षण पदवी घेत असताना ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ उद्योजक बनण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यासाठी अनुभव ही महत्त्वाची शिदोरी आहे. विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व घडविताना मनमोकळेपणे संवाद कौशल्य निर्माण करून उद्योजकीय कौशल्य आत्मसात केल्यास उद्यमशीलतेकडे एक संधी म्हणून पहावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.