कुकडी प्रकल्पातील धरणांनी गाठली पन्नाशी
नारायणगाव, ता.१५: कुकडी प्रकल्पांतर्गत पाच धरणात मंगळवारी (ता.१५) सायंकाळी चार वाजेपर्यंत १५.३४ टीएमसी ( ५१.७१टक्के ) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ४.५१टीएमसी (१४.८८ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी जुलैअखेर कुकडी प्रकल्पात ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. कुकडी पाटबंधारे विभाग क्र. एकचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हांडे यांनी दिली.
कुकडी प्रकल्प हा पाच धरणांचा साखळी प्रकल्प आहे. प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता २९.५० टीएमसी आहे. मागील एक महिन्यापासून धरण पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात दररोज सुमारे ०.४ टीएमसी पाणी जमा होत आहे. माणिकडोह व पिंपळगाव जोगे या धरणाचा अपवाद वगळता इतर धरणात साठ टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणी साठा झाला आहे. उन्हाळी आवर्तनासाठी पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठ्याचा वापर करण्यात आला होता. यामुळे या धरणात मृतसाठा पाणी संचय होऊन ३०.६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.कुकडी प्रकल्पाअंतर्गत महत्त्वाच्या डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात एक जून पासून सर्वाधिक ५५४ मिलिमीटर पाऊस झाला असून या धरणात ७३.०४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
येडगाव धरण पाणलोट क्षेत्रात सर्वात कमी १८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र या धरणात चिल्हेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने येडगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणात ७८.६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. येडगाव धरणातून वीजगृहमार्गे कुकडी डावा कालव्यात १३०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जलविद्युत निर्मिती बरोबरच नगर व सोलापूर जिल्ह्यातील बंधारे भरण्यासाठी या पाण्याचा उपयोग होत आहे.
धरण निहाय उपयुक्त पाणी साठा टीएमसीमध्ये (कंसात टक्के) :
येडगाव: १.५२ (७८.६४)
माणिकडोह: २.७१ (२६.६७)
वडज : ०.७८४ (६६.८९)
डिंभा : ९.१२ ( ७३.०४)
चिल्हेवाडी : ०.६२५ ७७.९१
06875
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.