सुजाण नागरिक म्हणून जगा
नारायणगाव, ता. २० : ‘‘गुन्हा घडल्यानंतर पोलिस ठाणे, वकील, न्यायालय या परिस्थितीचा सामना करावा लागतो. आपल्याकडून गुन्हा होणार नाही, पोलिस ठाण्याला जावेच लागणार नाही याची काळजी घ्या. एक सुजाण नागरिक म्हणून जगा.’’ असा सल्ला जुन्नरच्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर नम्रता बिरादार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जागतिक न्यायदिवसाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती जुन्नर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व जुन्नर तालुका बार असोसिएशन यांच्या वतीने येथील वसंत व्हिला सभागृहात विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. ग्रामोन्नती मंडळाचे संस्थापक गुरुवर्य राप सबनीस यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या वेळी ॲड. निर्णया गाडेकर, ॲड. राजेंद्र कोल्हे, ॲड. आरती नलावडे, ॲड. सचिन चव्हाण यांनी अनुक्रमे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ,’ पोस्को कायदा जागरूकता, जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन, कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर नम्रता बिरादार होत्या. कार्यक्रमास ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष, कृषीरत्न अनिल मेहेर, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, मुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे, उपप्राचार्य हनुमंत काळे, जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष, ॲड. शिवदास तांबे, सचिव ॲड. आशिष वानखेडे, ॲड. सचिन चव्हाण, ॲड. निर्णया गाडेकर, ॲड. राजेंद्र कोल्हे, ॲड. आरती नलावडे, ॲड. मनोबल चासकर, ॲड. रोमन, ॲड. अभिषेक भुजबळ, ॲड. मंजिरी कोल्हे, ॲड. मिथिलेश शिंदे, न्यायालयीन कर्मचारी प्रशांत मोरतळे उपस्थित होते. या वेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष मेहेर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अध्यक्ष ॲड. शिवदास तांबे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. प्रवीण मदगुले यांनी केले.