मीना नदीच्या काठावर वसलेले श्री भागेश्वर महाराज मंदिर
रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. २८: नारायणगाव व वारूळवाडी परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले शिवकालीन श्री भागेश्वर महाराज मंदिर येथील पूर्ववाहिनी मीना नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. दगडी बांधकाम असलेले गाभारा, शिवपिंड व गाभाऱ्या समोर असलेला सभामंडप स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे.
श्री भागेश्वर देवस्थान ट्रस्ट, वारुळवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचा जीर्णोद्धार केला असून परिसराचे सुशोभीकरण केले आहे. मंदिराचा परिसर निसर्ग रम्य आहे. श्रावण महिन्यात यावर्षी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
श्री भागेश्वर महाराज मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मंदिरात उत्तराभिमुख दगडी शिवपिंड आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. दगडी शिवपिंडाची झीज होऊ लागल्यामुळे देवस्थान ट्रस्टच्या वतीने पितळ धातूचा लेप लावून शिवपिंड संरक्षित केले आहे. दरवर्षी श्रावण महिना व महाशिवरात्रीनिमित्त वारूळवाडी व नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने येथील ग्रामदैवत श्री भागेश्वर महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
मंदिराजवळील धार्मिक स्थळे
श्री भागेश्वर महाराज, श्री हनुमान
श्री मुक्ताबाई देवी, भक्त पुंडलिक,
श्रीहरी स्वामी महाराज व बाळकाराम महाराज संजीवन समाधी,
श्रीराम मंदिर,
श्री भागेश्वर महाराज मंदिरात देवस्थान ट्रस्ट, यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी देवास अभिषेक, डव डहाळे, घागरी व पालखी मिरवणुक, ग्रामप्रदक्षिणा,भाविकांना खिचडी, केळी महाप्रसादाचे वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच श्रावण महिन्यात पहाटे चार ते रात्री दहा दरम्यान काकडा भजन, तुकाराम महाराज गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, महाप्रसाद आदी दैनंदिन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
चक्रधर महाराज पाचपुते, भगवान महाराज खेडकर, नारायण महाराज सारगुटे, रीष महाराज शेंडे, दत्तात्रेय महाराज रुकारे, नाथा महाराज भटकळ, आदिनाथ महाराज जुन्नरकर, विशाल महाराज हाडवळे यांच्या कीर्तनसेवेने भाविक मंत्रमुग्ध होतात.
06944, 06946
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.