कुकडी प्रकल्पात ६८ टक्के पाणीसाठा
नारायणगाव, ता.१०: कुकडी प्रकल्पांतर्गत पाच धरणात रविवारी (ता.१०) सायंकाळी चार वाजेपर्यंत २०.४६७ टीएमसी (६८.९६टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामाच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
माणिक डोह धरणाचा अपवाद वगळता प्रकल्पांतर्गत इतर धरणात सरासरी ७० टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आज अखेर कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात २० टीएमसी (६७.४७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. कुकडी प्रकल्प हा पाच धरणांचा साखळी प्रकल्प आहे. प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता २९.६८० टीएमसी आहे. जून महिन्यापासून धरण पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातील पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या अहिल्यानगर पुणे व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत असल्याने कुकडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. येडगाव धरणातून मागील एक महिन्यापासून कुकडी डावा कालव्यात वीजगृहमार्गे एक हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ पारनेर,कर्जत,करमाळा,श्रीगोंदा या भागाला सिंचन व बिगर सिंचनासाठी होत आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत सर्वाधिक साडेतेरा टीएमसी उपयुक्त पाणी साठवण क्षमता असलेल्या डिंभे धरणात ११.२३४ टीएमसी (८९. ११ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. १०.१८० टीएमसी उपयुक्त पाणी साठवण क्षमता असलेल्या माणिकडोह धरणात ४.३७२ टीएमसी (४२.९५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. माणिकडोह धरणात समाधानकारक पाणीसाठा होण्याची प्रतीक्षा आहे. माणिकडोह धरणाचा अपवाद वगळता इतर धरणात सरासरी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणी साठा झाला आहे.
दरम्यान, जुन्नर-आंबेगाव तालुक्याला जोडणारा डिंभे धरणाचा डावा कालवा ५५ किलोमीटर लांबीचा आहे. या कालव्याचे ४५ ते ५५ किलोमीटर दरम्यानचे दुरुस्तीचे काम सुरू आहे.
रविवारपर्यंतचा धरण निहाय उपयुक्त साठा (टीएमसी) आणि टक्केवारी
येडगाव........१.४५२ ........ ७४.७१
माणिकडोह........४.३७२ ........४२.९५
वडज........०.९००........७६.७३
पिंपळगाव जोगा........२.६०७ ........६७.०१
डिंभे........११.२३४........८९. ११
चिल्हेवाडी........०.६१८........७७
07024
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.