भाजीपाला उत्पादकांचे चेहरे कोमेजले
नारायणगाव, ता. ३ : पावसाने उघडीप दिल्यामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात बुधवारी (ता.३) भाजीपाल्याची आवक वाढली आहे. सुमारे साडेचार हजार भाजीपाल्यांच्या डागांची आवक झाली. फ्लॉवर, कोबी, काकडी, वांगी, टोमॅटो बाजारभावात घट झाली आहे. कोबीला प्रतिकिलोग्रॅम एक रुपये ते पाच रुपयाच्या दरम्यान तर काकडीला तीन रुपये ते वीस रुपयांच्या दरम्यान मातीमोल बाजारभाव मिळाला आहे. बाजारभावाअभावी ऐन गणेशोत्सवात भाजीपाला उत्पादकांचे चेहरे कोमेजले.
बाजारात गवार, वालवड, पापडी, तोंडली, फरशी, वाटाणा, शेवगा, हिरवी मिरची आदी भाजीपाल्याचे बाजारभाव स्थिर आहेत. भाजीपाला उत्पादनासाठी मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित बियाणे आदींचा होणारा भांडवली खर्च व मिळणारा सध्याचा बाजार भाव पाहता भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक अडचणीचे ठरत आहे.
नारायणगाव उपबाजारात सकाळी टोमॅटोचे तर दुपारी भाजीपाल्याचे लिलाव होतात. दरम्यान, उपबाजारात सुमारे ४० प्रकारच्या साडेचार हजार भाजीपाल्याच्या डागांची आवक झाली. यापैकी काकडी, फ्लॉवर, कोबी या भाजीपाल्याची सर्वाधिक दोन हजार डागांची आवक झाली.
प्रमुख भाजीपाल्याचे दहा किलोग्रॅमचे बाजारभाव (रुपयांत) पुढीलप्रमाणे (कंसात डाग आवक ):- फ्लॉवर :३० ते २०० रुपये (४००) ,कोबी: १० ते ५६ (९१३), फरशी : ५० ते ६५१(३००), काकडी :३० ते २००(७२४), हिरवी मिरची : ५० ते ५५१ (२१६), घेवडा : १०० ते ४०० (१५६), वांगी चिव चिव :३० ते १०० (३७), चवळी : ५० ते ४०० (२१४), दुधी :३० ते २०० (९७), गवार:६० ते ७०० (१५४), भेंडी : ५० ते ३३७ (१२६), ढोबळी मिरची :४० ते ४००(१०३), कारले : ४० ते २०० (१४०), दोडका : ५० ते ४०० (३८ ), तोंडली : २०० ते ६०० (१२), आले : १५० ते ५०० (११), गाजर:१०० ते ३०० (७०), बिट : ३० ते १८० (१२६), वाटाणा : ६३० ते ९०० (२६), शेवगा : १०० ते ७००(८), मका : २० ते ९०(६९८), सीताफळ : १०० ते ५००(१६)
टोमॅटोच्या क्रेटमागे ५० ते ६० रुपयांची घट
उपबाजारात जुन्नर, आंबेगाव,पारनेर, शिरूर, बीड बारामती भागातून सुमारे १८ हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. प्रतवारीनुसार क्रेटला १५१ रुपये ते ४०० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला. क्रेट मागे बाजारभावात ५० ते ६० रुपयांची घट झाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
कोथंबीर, मेथी व शेपूचे भाव स्थिर
उपबाजारात कोथंबीर, मेथी व शेपूच्या चार लाख २१ हजार जुड्यांची आवक झाली. अनुक्रमे शेकडा १०१ ते २ हजार १०१ रुपये, १०१ ते दोन हजार ३०१ रुपये, १०१ ते १ हजार ६५१ रुपये बाजारभाव मिळाला. मागील एक महिन्यापासून कोथंबीर, मेथी व शेपूचे बाजारभाव स्थिर आहेत.
07100
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.