नारायणगावात पैगंबर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
नारायणगाव, ता. ८ : सुन्नी मुस्लिम जमात नारायणगाव (ता. जुन्नर) यांच्या वतीने सलाम पठण, सामुहिक कुराण पठण, मिठाई वाटप, मक्का मदिना प्रतिकृतीची मिरवणूक आदी कार्यक्रमाचे आयोजन करून इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गणेशोत्सवामुळे नारायणगाव पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणूक शुक्रवारी (ता. ५) न काढता रविवारी (ता. ७) काढली. त्यानुसार रविवारी नारायणगाव बाजारपेठेतून मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात आला होता. यावेळी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मक्का मदिना प्रतिकृतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मुफ्ती मुनाजीर हुसेन, मुस्लिम जमातचे अध्यक्ष एजाज आतार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ, छत्रपती शिवाजी चौक, हनुमान चौक, जुन्नर रस्ता ते बसस्थानक येथून भाजीबाजार मार्गे मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम मोहल्ला येथे मिरवणुकीची सांगता झाली.
यावेळी नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, उपसरपंच योगेश पाटे, सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, माजी उपसरपंच संतोष वाजगे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संतोष पाटे, आरिफ आतार, संतोष दांगट, जालिंदर खैरे, बाळा वाव्हळ, संकेत क्षीरसागर, शैलेश औटी आदी उपस्थित होते.
नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने मुस्लिम समाजाचे पदाधिकारी यांचा शाल व सन्मान चिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला. कुराण अध्ययन पूर्ण केल्याबद्दल मदरसा अरबीया गुलशने मदिनामधील ११ मुला-मुलींचे ‘तकमिल- ए- कुराण’ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुस्लिम जमात अध्यक्ष एजाज आतार, रशीद इनामदार, अली इनामदार, डॉ. लहू खैरे, जुबेर आतार, विश्वस्त हाजी नूरमोहम्मद मणियार, गफूर तांबोळी, सलीम मणियार, शफीक खान, निसार आतार, युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अशफाक पटेल आदी उपस्थित होते.
07139
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.