ग्रामीण भागातील मुलींची क्रीडा स्पर्धेत बाजी

ग्रामीण भागातील मुलींची क्रीडा स्पर्धेत बाजी

Published on

नारायणगाव, ता. १६ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जुन्नर तालुका क्रीडाशिक्षक संघटना, ग्रामोन्नती मंडळ संचलित गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांच्या वतीने येथील सबनीस विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते.
तीन गटात घेतलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थिनींनी भाग घेतला. स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थिनींची जिल्हा पातळीवर निवड झाली असून या स्पर्धा बालेवाडी येथे होणार आहेत, अशी माहिती ग्रामोन्नती मंडळाचे क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप डोळे, क्रीडा विभाग प्रमुख राहुल नवले यांनी दिली. विजेत्या खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे नियोजन नवले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक बबन गुळवे, कावजी भवारी, अजय कानडे, संदीप महाले, शैलेश कावळे, सचिन काशीद, तुळशीदास कोऱ्हाळे, मेहबूब काझी, शंकर केंगले, वृषाली वाघ यांनी केले.

वयोगट व क्रीडा प्रकारानुसार स्पर्धेचा निकाल :
१४ वर्षे (अनुक्रमे क्रमांक) : १०० मीटर धावणे - सिया कोकणे, गौरी कोद्या, मृणाल ढवळे. २०० मीटर धावणे : सिया कोकणे, अद्वियता कोऱ्हाळे, समीक्षा भुजबळ. ४०० मीटर धावणे : अद्वियता कोऱ्हाळे, माधुरी राजभर, मृदिनी जाधव. ८०० मीटर धावणे : राजश्री रसाळ, मृणाल ढवळे, कायनात मोमीन.
८० मीटर हार्डल्स : अनन्या चव्हाण, रीदा आतार.
थाळी फेक : समृद्धी पुजारी, स्नेहा भोर, प्रज्ञा ताम्हाणे.
उंच उडी : समृद्धी येवले, रोशनी इनामदार, दिव्या चव्हाण. लांब उडी : शर्वरी जगताप, अनन्या चव्हाण, मनस्वी वाघ. गोळा फेक : गिरिजा बनकर, सिया महाबरे, आराध्या डोंगरे.
४×१०० मी. रिले : प्रथम : अद्विता कोऱ्हाळे, जानव्ही वायकर, तनिष्का कोऱ्हाळे, श्रीशा गुंजाळ (सर्व ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी). द्वितीय : जान्हवी धवसे, स्वरा जाधेकर, नेहा दाते, आर्या स्वामी (सर्व गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर विद्यार्थिनी).
१७ वर्षे वयोगट : १०० मीटर धावणे - हेमाली दळवी, वेदिका पथवे, प्राची डोंगरे. २०० मीटर धावणे : कस्तुरी चव्हाण, वेदिका पथवे, ईश्वरी जगताप. ४०० मीटर धावणे : सृष्टी लोंढे, मधुरा उंडे, प्रज्ञा गोफणे. ८०० मीटर धावणे:स्वाती डवले, श्रेया वायकर,पूनम धांगडा. १५०० मीटर धावणे : वृषाली मधे,राजेश्वरी धुरी, धनश्री डोके. ३००० मीटर धावणे : वृषाली मधे, शिवानी भालेकर, धनश्री डोके.
१०० मीटर हार्डल्स : कस्तुरी चव्हाण, श्रावणी चौधरी, समृद्धी शेळके. ४०० मीटर हार्डल्स: कस्तुरी चव्हाण, आर्या रासने, हर्षदा पवार.
उंच उडी : सानिया जाधव, स्वराली मांडे, माधुरी भागवत. लांब उडी : ऋचा मेहेर, सिद्धी शिंदे, प्राची डोंगरे. तिहेरी उडी : आर्या रासणे, श्रेया वायकर, राणी जाधव.
३ किलोमीटर चालणे : मनस्वी डोके, संचिता गुळवे, वेदिका वाघ.
४×१०० मी. रिले : प्रथम - समीक्षा दांगट, आर्या मोरे, विद्या मोरे, प्रिया कालेकर. (सर्व रेवूबाई देवकर विद्यालय विद्यार्थ्यांनी).
द्वितीय : समृद्धी लोंढे, प्राची डोंगरे, संचिता गुळवे, सई शिरतर (सर्व गुंजाळवाडी माध्यमिक विद्यालय).
४×४०० मी. रिले : प्रथम - पुनम धांगडा, अश्विनी धांगडा, स्वामी वांगड, समीक्षा बारगा (सर्व जे.आर.गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल). द्वितीय : संस्कृती बाणखेले, साक्षी पांडे, समीक्षा घोलप, धनश्री डोके (सर्व श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर).
गोळा फेक : श्रेया बटवाल, रिया श्रीरामे, वेदिका नायकोडी. थाळी फेक : आर्या गव्हाणे, वेदिका नायकोडी, श्रेया बटवाल. भालाफेक : तन्वी रोकडे, हेलम राम, सिद्धी शिंदे. हातोडा फेक : ऋतिका मुजुमले, तन्वी रोकडे, अनुष्का विधाटे.
१९ वर्षे वयोगट :
१०० मीटर धावणे : आर्या खांडगे, जयश्री कोकणे, स्नेहा लोहटे. २०० मीटर धावणे : आर्या खांडगे, मयूरी दाते, ईश्वरी दाते. ४०० मीटर धावणे : सोनल भालेकर, आर्या खांडगे, साक्षी खरात. ८०० मीटर धावणे : नेहा फापाळे, वैष्णवी ठीकेकर, सोनल पारधी. १५०० मीटर धावणे : वैष्णवी ठीकेकर, नेहा फापाळे, जयश्री कोकणे. ३००० मीटर धावणे : वैष्णवी ठीकेकर, नेहा फापाळे, आदिती भालेकर.
१०० मीटर हार्डल्स: तन्वी शिंदे.
उंच उडी : वेदिका भाईक, आरती परदेशी, तन्वी शिंदे. लांब उडी : वेदिका भाईक, शिवानी पवार, सिद्धी सोनवणे. तिहेरी उडी : वेदिका भाईक, शिवानी पवार, आकांक्षा काशीद. गोळा फेक : नेहरिका काळे, वैष्णवी गायखे, स्नेहल शेंडे. थाळी फेक : अंजली कानडे, वैष्णवी गायके, सानिका डुंबरे.भालाफेक : प्रतीक्षा बेळे, अंजली कानडे, सिद्धी मडके.
तीन कि.मी. चालणे : राजश्री पवार, अनुश्री पानसरे, तेजल घाडगे.
४×१०० मी. रिले : प्रथम - सोनल भालेकर, हीना बोऱ्हाडे, सोनल पारधी, आरती परदेशी (सर्व शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर).
द्वितीय : पूजा पारवे, आर्या खांडगे, धनश्री जाधव, श्रावणी लोहटे (सर्व गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव). ४४०० मी. रिले : प्रथम : नेहा फापाळे, राजश्री पवार, वेदिका भाईक, वैष्णवी ठीकेकर (सर्व चैतन्य विद्यालय ओतूर). द्वितीय : सोनल भालेकर, टीना बोऱ्हाडे, सोनल पारधी, आरती परदेशी. (सर्व शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर).
क्रॉस कंट्री : वैष्णवी ठीकेकर, नेहा फापाळे, कृष्णा आचार्य.
हातोडा फेक : ऋतिका मुजुमले, तन्वी रोकडे, अनुष्का विधाटे.

Marathi News Esakal
www.esakal.com