शॉर्टसर्किटच्या आगीत आठ कोटींचा ‘झटका’
रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. ३ : शॉर्टसर्किटमुळे व्यावसायिक दुकाने, गोदामे आदींना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. नारायणगाव, वारूळवाडी परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नारायणगाव परिसरात झालेल्या आगीच्या मागील चार वर्षांत ११ घटनेत व्यवसायिकांचे सुमारे आठ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शॉर्टसर्किटच्या विविध घटनांत दिवसेंदिवस वाढत आहेत.
आगीच्या घटनांमध्ये ऊस उत्पादकांसह व्यवसायिकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. वीज पारेषण कंपनीच्या तज्ज्ञांनी आगीच्या कारणांचा आढावा घेतला असता आगीच्या बहुतेक घटना रात्रीच्या वेळी व सदोष वीज जोडणीमुळे घडलेल्या आहेत. दरम्यान वीज जोडणी करताना पुरेशी काळजी घेतल्यास व आठ ते दहा वर्षांनी वीज वाहकतारांची तपासणी करून वीज वाहक तारा बदलल्यास या घटना टाळता येऊ शकतात.
शॉर्टसर्किट होण्याची कारण
- सदोष पद्धतीने केलेली वीज जोडणी
- अर्थिंगचा अभाव, अतिभार
- जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा
- वीज जोडणीत एमसीबी
- आरसीसीबीचा वापर न करणे
- मीटर स्वयंपाक घरात असणे
- इन्व्हर्टरची अयोग्य जोडणी, गोडाऊन साठी पत्र्याच्या शेडचा वापर,
- कुजलेल्या प्लॅस्टिक आवरण नसलेल्या व हलक्या दर्जाच्या वीज वाहक तारा,
- प्रमाणापेक्षा जास्त वीज भार असलेल्या इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर.
नारायणगाव येथील मारुती इंटरप्राईजेस व मंडप डेकोरेशन साहित्य असलेल्या गोदामाला आग लागून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. गोदामातील लोखंडी पात्र्याला प्लॅस्टिक आवरण नसलेल्या वीज वाहक तारेचा स्पर्श झाल्याने वीज भार वाढून ठिनग्या पडून आग लागली. दुसऱ्या घटनेत इन्वर्टरच्या अयोग्य जोडणीमुळे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे आग लागून दोन मजली कापड दुकान, मेडिकल औषध, दुकानास आग लागून सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- बी. एस. बिराजदार, शाखा अभियंता, महापारेषण नारायणगाव विभाग
असे टाळा शॉर्टसर्किट
१. वीज जोडणीत एमसीबी (मिनीचर सर्किट ब्रेकर) आरसीसीबी (रेसिड्युल करंट सर्किट ब्रेकर) वापरा
२. यामुळेशॉर्टसर्किट झाल्यास तत्काळ वीजप्रवाह बंद होईल व आगीची घटना टळेल
३. आठ ते दहा वर्षानंतर वीजवाहक तारांची तपासणी करा
४. तारांवरील विद्युत रोधक आवरण जीर्ण झाल्यास वीज वाहकतारा बदलाव्यात.
५. स्वयंपाक खोलीत उष्णतेमुळे वीज वाहक तारा खराब होतात .विद्युत मीटर स्वयंपाक खोलीत नसावा. घराबाहेर असावा.
६. गोदामासाठी पत्र्याचा वापर करू नये. पत्र्यालगत वीजवाहतारांची जोडणी नसावी.
७. योग्य अर्थिंगची जोडणी करावी. तारा चांगल्या गुणवत्तेच्या असाव्यात
८. जुन्या अपार्टमेंटमधील वीजवाहक तारा, स्वीच बदलावेत.
९. वीजवाहक तारांची क्षमता, वीज भार आदींचा विचार करून फ्रिज,
वॉशिंग मशिन, हिटर, गिझर आदि उपकरणांचा वापर करावा.
१० जोडणी करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.
शॉर्टसर्किटमुळे वारुळवाडी, नारायणगाव परिसरात घडल्या मोठ्या घटना
क्र.............घटनेचा दिनांक....... दुकानाचे नाव............ झालेले नुकसान (रुपयांत)
१. १९ ऑगस्ट २०२०.................मसाला उद्योजक मनोहर दळवी व महेंद्र दळवी यांची चार व्यावसायिक दुकान..........५३ लाख
२. चार जानेवारी २०२२.............श्री मुक्ताई कलेक्शन रेडिमेड कापड विक्रीचे दुकान...............तीन लाख
३. २६ सप्टेंबर२०२२.................विक्रम मंडप डेकोरेटर.................अडीच कोटी
४. १५ फेब्रुवारी२०२३.................कोल्हे मळा- ओझर रस्त्यालगतच्या दुकानातील प्लॅस्टिकचे भंगार साहित्य जळून खाक
५. ८ ऑगस्ट २०२४.................हॉटेल कृष्णा व कृष्णा ऑटोमोबाईल.................नऊ लाख
६.२० ऑगस्ट २०२४.................फुलसुंदर मार्केटमधील श्री समर्थ कृपा प्लॅस्टिक अँड टॉईजचे दुकान .................१२ लाख
७. १४ ऑक्टोबर २०२४.................अल्पभूधारक शेतकरी गोपीनाथ गोविंद बोऱ्हाडे यांचे घर. प्रापंचिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोंबड्यांचे खुराडे, गाईचा गोठा ....
८. २६ फेब्रुवारी २०२५.................वारुळवाडी येथील महावितरण कंपनीच्या प्रक्षेत्राला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली.
९. १८ मार्च २०२५.................अष्टविनायक रेडीमेड या दोन मजली कापड दुकान व वऱ्हाडी मेडिकल औषध दुकानाला आग ................. चार कोटी
१०. २३ मार्च २०२५.................साई-सिद्धी सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेला आग
११. २१नोव्हेंबर २०२५.................तुषार दिवटे यांच्या मारुती एंटरप्राइजेस गोदामाला आग .................५० लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

