एनसीएल स्पर्धेत जनजीवन सम्राट संघ विजेता
नारायणगाव, ता. ३० : धांडे स्पोर्ट्स, नारायणगाव व वारूळवाडी ग्रामस्थ आयोजित नारायणगाव क्रिकेट लीग २०२५ (एनसीएल) या स्पर्धेत हर्षल वाजगे यांच्या निरंजन नेवकर जनजीवन सम्राट संघ विजेता ठरला आहे. या संघाने प्रथम क्रमांकाचे रोख ५१ हजार रुपयांचे बक्षीस व एनसीएल कप पटकावला. लिटिल मास्टर स्पोर्ट क्लब त्रिशा इलेव्हन हा संघ उपविजेता ठरला.
येथील स्वर्गीय दिलीप कोठारी स्टेडिअममध्ये २२ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान, नारायणगाव क्रिकेट लीग २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे यंदाचे दहावे वर्ष होते. या क्रिकेट स्पर्धेत एकूण १२ संघ व १८० खेळाडूंनी भाग घेतला होता. यानिमित्त प्रथम चार क्रमांकात येणाऱ्या संघांसाठी अनुक्रमे ५१, ४१, ३१, २५ हजार रुपयांची बक्षीसे ठेवली होती.
या व्यतिरिक्त उत्कृष्ट झेल, षटकार, चौकार, विकेट हॅटट्रिक, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टी रक्षक, शिस्तबद्ध संघ आदींसाठी तीन सायकल, इलेक्ट्रिक स्कुटी या सह रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली. बक्षीस वितरण विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, उपसरपंच योगेश पाटे, भाजप नेते आशिष माळवदकर, माजी सरपंच आत्माराम संते, किरण वाजगे, तेजस पाटे, हेमंत कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. समालोचन प्रवीण गायकवाड, मनोज बेल्हेकर यांनी केले. सूत्रसंचालन अजित वाजगे, किरण गुंजाळ अभिजित नारुडकर यांनी केले. स्पर्धेचे नियोजन मच्छिंद्र जगताप, प्रशांत इचके, जालिंदर खैरे, राजू पाटे, पवन खैरे, राहुल पापळ, नीलेश रसाळ, सागर नांगरे यांनी केले.
स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे
प्रथम - निरंजन नेवकर जनजीवन सम्राट
द्वितीय - त्रिशा इलेव्हन
तृतीय - मुक्ताई विक्रांत वॉरिअर्स
चतुर्थ - अमर प्रतिष्ठान
वैयक्तिक बक्षीसे
मॅन ऑफ द सिरीज- अमोल घोडेकर
उत्कृष्ट फलंदाज- अंकित विटे
उत्कृष्ट गोलंदाज- पवन खैरे
मैदानाचा राजा - बेराज रजपूत
उत्कृष्ट आदिवासी खेळाडू- जयेश कडाळे
07663
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

