सुक्ष्म अन्नद्रव्ये वापरून एकरी १२० टन उत्पादन काढा

सुक्ष्म अन्नद्रव्ये वापरून एकरी १२० टन उत्पादन काढा

Published on

नारायणगाव, ता.१२ : ‘‘शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी व आडसाली ऊस लागवड करावी. दोन ओळींमध्ये सहा फुटांपर्यंत तर दोन रोपांत दीड ते दोन फुटांपर्यंत अंतर ठेवावे. को-२६५ जात खारवट चोपण जमिनीसाठी विकसित करण्यात आलेली आहे. इतर जमिनीसाठी को-८६०३२ या जातीचा अवलंब करावा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून जातिवंत बियाणे आणून स्वतःचा बेणेमळा तयार करावा. ऊस लागवडीपूर्वी माती परिक्षण करून नत्रःस्फुरदः पालाश व सुक्ष्म अन्नद्रव्ये यांचा संतुलित वापर करावा व उत्पादकांनी एकरी १२० टन ऊस उत्पादन काढावे,’’ असा सल्ला मांजरी पुणे येथील व्हीएसआयचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी दिला आहे.

कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) नारायणगाव आयोजित ऊस पिकातील एआय व उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील पीक परिसंवादात हापसे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी केव्हीकेने सलाम किसान कंपनीचे कार्यकारी संचालक अक्षय खोब्रागडे यांच्या उपस्थितीत सलाम किसान या कंपनीबरोबर ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केला. अध्यक्षस्थानी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे होते.
यावेळी केव्हीकेचे अध्यक्ष अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे, संचालक तानाजी वारूळे, रत्नदीप भरविरकर, विघ्नहरचे उपाध्यक्ष अशोक घोलप, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, कार्यकारी संचालक भास्कर घुले, चंद्रकांत ढगे, इथेक्स सॉफ्टकॉन प्रा. लि.चे संचालक ऋजित मेहेर उपस्थित होते.
डॉ. हापसे म्हणाले जमिनीच्या जैविक सुपीकता, रासायनिक सुपीकता व भौतिक सुपिकतेकडे लक्ष द्यावे. सेंद्रिय कर्ब २ टक्क्यापर्यंत वाढणे गरजेचे आहे. शंख, शिंपल्यांपासून तयार केलेले वसंत ऊर्जा या औषधाची फवारणी ६०, ९०, १२० दिवसाच्या अंतराने केली असता उसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व उत्पन्न वाढते. अतिवृष्टीच्या काळात ड्रोनद्वारे फवारणी करण्यात यावी..

डॉ. राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी आभार मानले.


Associated Media Id07737s : NAR26B07737

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com