सोन्या-चांदीचे दागिने नारायणगावातून लंपास
नारायणगाव, ता. २५: येथील संस्कार लक्ष्मी नंदनवन सोसायटीमधील सदनिकेच्या लोखंडी सेफ्टी व मेन दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी दोन लाख ९८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (ता.२५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाली.
चोरीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून, याप्रकरणी तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली. याप्रकरणी ग्रामसेवक चिंतामण बबन केंगले (वय ४५ रा.संस्कार लक्ष्मी नंदनवन सोसायटी,सी विंग फ्लॅट नं.१, शेटेमळा, नारायणगाव) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी चिंतामण केंगले यांच्या बंद सदनिकेच्या लोखंडी सेफ्टी दरवाजा व मेन दरवाजाचा कडी कोयंडा तोडून सदनिकेमधील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने व ९२ हजार ५०० रुपये किमतीचे गणपतीचे चांदीचे दागिने असा दोन लाख ९८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
नारायणगाव, वारूळवाडी परिसरात बंद सदनिका व घरफोडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यात बंद सदनिकांच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अथवा खिडकीचे ग्रील तोडून सुमारे ५० तोळे सोन्याचे व १४० तोळे चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली आहे. बहुतेक ठिकाणचे चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. एका चोरीचा अपवाद वगळता इतर चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.
दरम्यान, १७ डिसेंबर २०२५ रोजी वारूळवाडी येथील अनिकेत डोंगरे बंद घराचे खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चार तोळे सोन्याचे, ११६ तोळे चांदीचे दागिने व साठ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला होता. तर ४ डिसेंबर २०२५ रोजी कोल्हे मळा येथील सुविधा रेसिडेन्सी व समृद्धी रेसिडेन्सी या गृहनिर्माण सोसायटीमधील सहा सदनिकांचा दरवाजा व सेफ्टी लोखंडी दरवाजाचे कडी कोयंडा व लॉक तोडून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
दरम्यान, सोन्याचे भाव वाढल्यामुळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गॅस कटरसारख्या आधुनिक उपकरणांचा वापर वापर करून चोरटे काही मिनिटात बंद घरे,फ्लॅट मध्ये चोरी करून पसार होत आहेत. चोरट्यांनी पोलिसांमुळे मोठे आव्हान निर्माण केले आहे.
07782
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

