नारायणगावच्या सौरभ मंडलीक यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार
नारायणगाव, ता. १७ : नाशिक येथील संजिवनी फाउंडेशन यांच्या वतीने नारायणगाव (ता. जुन्नर) येथील दुर्ग संवर्धक व अभ्यासक सौरभ भगवान मंडलीक यांना ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिरात शनिवारी (ता. १४) झालेल्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री बच्चू कडू, रविकांत तुपकर, पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या हस्ते मंडलीक यांना हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजिवनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर सानप होते.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, संग्राम शेवाळे, उदय सांगळे, हरिभाऊ गीते, विकास नवाळे, कृष्णराज पाटील, स्मिता मंडलीक आदी उपस्थित होते.
मंडलीक हे मागील २५ वर्षापासून दुर्ग संवर्धन व संशोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील ३६० किल्ले व देशातील २११ किल्ल्यांना भेट देऊन या किल्ल्यांचा अभ्यास केला आहे. ते शिलालेख व मूर्तीशास्त्र संशोधन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, युद्धनीती व गड किल्ले यांची माहिती शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्याख्यानाच्या माध्यमातून जागृती करण्याचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी राष्ट्रपिता राष्ट्रीय पुरस्कार, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार, शिवस्मारक समिती विशेष पुरस्कार, मूर्ती व शिलालेख संशोधन पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
07895
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

