आर्वी भागात बिबट्यांचा धुडगूस

आर्वी भागात बिबट्यांचा धुडगूस

Published on

नारायणगाव, ता. २४ : बिबट्यांनी धुडगूस घातल्यामुळे आर्वी (ता. जुन्नर) भागातील गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीस आलेले गव्हाचे उभे पीक आडवे झाले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने येथील विजय गाढवे यांच्या शेतात मंगळवारी (ता. २४) दुपारी पिंजरा लावला आहे. या भागात यापूर्वी चार ते पाच बिबटे जेरबंद करण्यात यश मिळाले आहे, अशा माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ यांनी दिली.
शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी सकाळी वनरक्षक पवार, भुजबळ यांनी आर्वी येथे भेट देऊन पिकांची पाहणी केली. बिबट्यांनी रात्रीच्या वेळी धुडगूस घातल्यामुळे बऱ्याच ठिकाणी गव्हाचे उभे पीक आडवे झालेले दिसून आले. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे सुद्धा आढळून आले. त्यामुळे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावण्यात आला आहे.

07922

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com