वृक्ष, वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात

वृक्ष, वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात

Published on

नारायणगाव, ता. ८ : येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या डिंभे डावा कालव्या लगत जुन्नर व आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर वन विभागाच्या जागेत मागील वर्षभरापासून अनधिकृत कचरा डेपो तयार करण्यात आला आहे. यातील कचरा वारंवार पेटवून दिला जात आहे. धुराच्या प्रदूषणामुळे या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्लॅस्टिक कचरा व धुरामुळे येथील लवकी डोंगराच्या वनविभागातील वृक्ष,वन्य प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
येथील डिंभे डावा कालव्याच्या दक्षिण बाजूस वारूळवाडी व कळंब ग्रामपंचायतीची शिव आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीच्या हद्दीत महामार्ग लगत असलेले ढाबा, हॉटेल व्यावसायिक व कृषिमाल खरेदी करणाऱ्या कंपन्या थर्माकोल, प्लॅस्टिकसह अन्य कचरा मागील एक वर्षापासून टाकत आहेत. कचरा साठल्यानंतर
पेटवून दिला जातो.
वनविभागाच्या हद्दीतील लवकी डोंगर पायथ्याशी मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या भागात ससा, कोल्हे, तरस, बिबट, बगळे आदि वन्य प्राणी व पक्ष्यांची
वस्तिस्थाने आहेत. कालव्यालगत दक्षिण बाजूला कचऱ्याचे ढीग साठले आहेत. प्लॅस्टिक कचरा हवेमुळे उडून डिंभे डावा कालव्यातील पाण्यात जातो. हा प्लॅस्टिक कचरा पाण्या च्या प्रवाह बरोबर पुढे येडगाव जलाशयात जातो. दोन ते तीन दिवसानंतर हा कचरा पेटवून दिला जातो. धुरामुळे परिसरात प्रदूषण होत आहे. हा भाग महामार्ग लगत आहे. कुकडी पाटबंधारे, महसूल, जिल्हा परिषद, वनविभागाचे अधिकारी याच महामार्गाने ये जा करत असतात. महामार्गावरून कचऱ्याचे ढीग व धुराचे लोट दिसत असूनही शासकीय अधिकारी गंभीर समस्या कडे लक्ष का देत नाही. असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

कळंब ग्रामपंचायत हद्दीत हा कचरा रात्रीच्या वेळी टाकला जात आहे. हा परिसर निसर्गरम्य आहे. कचऱ्याच्या ढिगामुळे व कचरा पेटवून दिल्यामुळे येथील निसर्ग संपदा धोक्यात आली आहे. यामुळे या भागातील सह्याद्री डोंगर परिसरात वारंवार वणवा लागत आहे. याकडे वनविभागाने लक्ष घालण्याची गरज आहे.
- राजेंद्र मेहेर, माजी सरपंच ग्रामपंचायत वारूळवाडी


07957

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com