टोमॅटो लागवडीवर उद्या नारायणगावात कार्यशाळा
नारायणगाव, ता. ८: कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव-दाभाडे यांच्या वतीने मंगळवारी (ता.१० ) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो उपबाजार आवारात टोमॅटो लागवड व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी तज्ञ सुशील धुमाळ,अमोल भोंग हे टोमॅटो लागवड व व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

