नारायणगावात भरदिवसा घरफोडी
नारायणगाव, ता. १५ : येथील शिवविहार सोसायटीत भरवस्तीत असलेल्या एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अवघ्या २० मिनिटांत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा नारायण दरेकर (वय ६५) या आपल्या मुलीसह शिवतेज बिल्डिंगमध्ये राहतात. दुपारी त्या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील दोन तोळे सोने, चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
कोल्हेमळा परिसरात चोऱ्यांचे सत्र
नारायणगावमधील कोल्हेमळा परिसरात गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या वाढली असली, तरी सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ४ डिसेंबर रोजीही सुविधा आणि समृद्धी रेसिडेन्सीमधील सहा सदनिका फोडून १० तोळे सोने व ८० हजारांची रोकड चोरण्यात आली होती. या गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

