मीनथडी जत्रेतून सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल

मीनथडी जत्रेतून सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल
Published on

नारायणगाव, ता. १३ : ग्रामीण भागातील महिला व बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोजित नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ‘मीनथडी’ जत्रेत दोन दिवसांत सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल झाली. या जत्रेमध्ये १८० स्टॉल्सच्या माध्यमातून झालेल्या या विक्रीला २५ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला, अशी माहिती इंद्रधनू ग्रुपच्या संस्थापिका राजश्री बोरकर यांनी दिली.
येथील शिवमुक्ताई मंगल कार्यालयाच्या प्रांगणात इंद्रधनू महिला ग्रुप, सावित्रीबाई फुले व जिजामाता महिला पतसंस्थेच्या वतीने या जत्रेचे आयोजन केले होते. याचे उद्‍घाटन जिल्हा परिषद सदस्या नेहा पाटे, नगराध्यक्षा सुजाता काजळे, पंचायत समिती सदस्या सुषमा वाव्हळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री बोरकर होत्या.
जत्रेत जुन्नर, आंबेगाव, सातारा, नाशिक, नगर व संगमनेर भागातील बचत गटांनी सहभाग घेतला होता. यात उन्हाळी वाळवण, मसाले, हातसडीचा तांदूळ, कडधान्य, ज्यूट व फॅन्सी पर्स, ज्वेलरी, साड्या आणि कपड्यांचे १८० स्टॉल्स लावले होते. ग्राहकांनी अळूवडी, मासवडी, शेंगुळी, थालिपीठ यांसारख्या अस्सल ग्रामीण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. या उपक्रमाचे नियोजन प्रांजल भुतडा, निवेदिता डावखर, शीतल ठुसे, प्रियांका बोरकर, मनिषा बोरा व सहकाऱ्यांनी केले. शीतल ठुसे यांनी सूत्रसंचालन केले.

महिलांनी एकत्र येऊन  स्थापन केलेल्या इंद्रधनू ग्रुपच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, स्वावलंबनाचे कार्य केले जात आहे. ही संस्था गरीब, गरजू महिलांसाठी कार्यरत आहे. ग्रामीण महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल आदींचे आयोजन केले जाते. इंद्रधनू ग्रुपच्या वतीने प्रशांत दामले यांच्या ‘‘शिकायला गेलो एक’’ या नाटकाचे आयोजन केले होते.
- राजश्री बोरकर, संस्थापिका, इंद्रधनू ग्रुप

08081

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com