

नारायणगाव, ता. २३ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात कोथिंबीर, मेथीची आवक घटली आहे. यामुळे बाजारभाव वधारले. बाजारात बुधवारी (ता. २२) रात्री झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला प्रतवारीनुसार शेकडा एक हजार ते चार हजार दोनशे रुपये तर मेथीच्या जुडीला प्रतवारीनुसार शेकडा एक हजार ते तीन हजार सहाशे रुपये या दरम्यान बाजारभाव मिळाला.
उपबाजार आवारात १ लाख ४० हजार जुड्यांची आवक झाली होती, अशी माहिती बाजार समितीचे संचालक सारंग घोलप, उपसचिव शरद घोंगडे यांनी दिली.
येथील उपबाजारात दररोज रात्री भाजीपाल्याचे लिलाव होतात. मार्चअखेर सुमारे अडीच हजार जुड्यांची आवक होत होती. एप्रिल महिना सुरू होताच पाणीटंचाई व तापमानात वाढ झाल्यामुळे कोथिंबीर व मेथीच्या जुड्यांची आवक घटली आहे. वाढलेल्या तापमानामुळे पेरणीनंतर कोथिंबीर व मेथीच्या बियांची उगवणक्षमतेत ५० टक्के घट झाली. यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने उपबाजारात जुड्यांची आवक घटली आहे. येथील लिलावात रोहित फुलसुंदर, समीर जाधव यांच्या कोथिंबिरीच्या जुड्यांना शेकडा अनुक्रमे चार हजार २००, तीन हजार ६०० रुपये असा वाढीव भाव मिळाला. रांजणी येथील शेतकरी विकास तळेकर यांच्या मेथीच्या जुडीला शेकडा १ हजार ६०० रुपये असा वाढीव भाव मिळाला, अशी माहिती व्यापारी कमलाकर वाजगे यांनी दिली.
टोमॅटोचा क्रेट १५० ते ४०० रुपये
संचालक सारंग घोलप म्हणाले, टोमॅटो बाजार आवारात टोमॅटोची उन्हाळी आवक सुरू झाली आहे. बाजारात सुमारे १८ हजार क्रेटची आवक झाली होती. सकाळी झालेल्या लिलावात प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला (२० किलो) १५० ते ४०० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला.
08114
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.