पिंपळगाव येथील बंधारा कोरडा

पिंपळगाव येथील बंधारा कोरडा
Published on

नारायणगाव, ता. २७ : मीना नदीवरील पिंपळगाव (ता. जुन्नर) येथील सतीकोन बंधारा गेल्या १५ दिवसांपासून कोरडा पडल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिके आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने वडज धरणातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी कुकडी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
गुंजाळवाडी आणि वडगाव परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. सावरगाव व वडगाव सहानी येथील बंधाऱ्यात पाणी सोडले असताना, पिंपळगावच्या सतीकोन बंधाऱ्याला डावलल्याचा आरोप शेतकरी संपत वाणी, दत्तात्रेय वाणी, सोपान खांडगे व कुंडलिक वाणी यांनी केला आहे. वाढत्या तापमानामुळे उभी पिके जळू लागली असून, गोपालन व्यवसायावरही संकट आले आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालून तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पिंपळगाव येथील बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वडज विभागाचे शाखा अभियंता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करतील. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- रवींद्र हांडे, उपकार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग

08121

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com