कुरंगवडी येथील कुरंजाई मंदिरात शुक्रवारपासून पौष पोर्णिमा उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरंगवडी येथील कुरंजाई मंदिरात शुक्रवारपासून पौष पोर्णिमा उत्सव
कुरंगवडी येथील कुरंजाई मंदिरात शुक्रवारपासून पौष पोर्णिमा उत्सव

कुरंगवडी येथील कुरंजाई मंदिरात शुक्रवारपासून पौष पोर्णिमा उत्सव

sakal_logo
By

नसरापूर, ता.२ : कुरंगवडी (ता.भोर) येथील श्री माता कुरंजाई मंदिरात शुक्रवारपासून (ता.६) पौष पोर्णिमा उत्सव सुरू होत आहे. यामुळे आठ जानेवारीपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
कुरंगवडी ग्रामस्थ व कुरंजाई माता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लोकनाट्य तमाशा ऐवजी सांप्रदायिक कार्यक्रम तसेच पारंपरिक ढोल लेझीम स्पर्धेचे आयोजन केले जाते. उत्सवात पहिल्या दिवशी पहाटे सहा ते सकाळी देवीच्या मूर्तीस महाभिषेक घालण्यात येईल. तसेच दुपारी ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिराच्या ध्वजाचे आगमन होणार आहे. सायंकाळी ५ ते ९ या दरम्यान संगीताचार्य गणेश महाराज भगत यांचे भजन होईल तर रात्री ९ ते १२ ढोल लेझीम स्पर्धा पार पडतील. रात्री १२ ते पहाटे ३ वाजे पर्यंत देवीचा छबिना व आरती होणार आहे.
दुसऱ्या दिवशी सांयकाळी संपुटीत नवचंडी पाठ होणार आहे. रविवारी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पहाटे देवीच्या मूर्तीस महाभिषेक संपुटीत नवचंडीयाग, आरती मंत्रपुष्पम होणार असून रात्री ९ वाजता गणेश महाराज भगत यांचे कीर्तन होणार आहे.
03019