केबल चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केबल चोरी
केबल चोरी

केबल चोरी

sakal_logo
By

नसरापूर, ता. ४ : पांडे (ता. भोर) येथे नीरा नदीकाठावरून आठ शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या एकूण १४५५ मीटर व ८७ हजार ३०० रुपये किमतीच्या केबलची चोरी झाली.
याबाबत साहेबराव शंकर साळुंखे (वय ६६, रा. पांडे) या शेतकऱ्याने राजगड पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. २० ते २२ जानेवारीदरम्यान पांडे येथे नीरा नदीवर शेतीसाठी पाणी घेण्यासाठी लावलेल्या विद्युत मोटारीची पट्टी केबल चोरीला गेली आहे. त्यामध्ये साहेबराव साळुंखे यांची १९० मीटर (११,४०० रुपये), भानुदास गुलाब साळुंखे यांची १२० मीटर (७२०० रुपये), संतोष वाघमारे यांची २२० मीटर (१३,२०० रुपये), संतोष सावंत यांची १५० मीटर (९००० रुपये), रामदास सावंत यांची १९० मीटर (११,४०० रुपये), दत्तात्रेय साळुंखे यांची १५० मीटर (९००० रुपये), सुनील थिटे यांची २२० मीटर (१३,२०० रुपये), विशाल साळुंखे यांची २१५ मीटर (१२,९०० रुपये), अशी एकूण आठ शेतकऱ्यांची मिळून ८७ हजार ३०० रुपयांची १४५५ मीटर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरली आहे.
याबाबत किकवी पोलिस चौकीत तक्रार दाखल केली असून, पोलिस नाईक मयूर निंबाळकर हे पुढील तपास करत आहेत.