कचरा डेपोसाठी तातडीने जागा द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा डेपोसाठी तातडीने जागा द्या
कचरा डेपोसाठी तातडीने जागा द्या

कचरा डेपोसाठी तातडीने जागा द्या

sakal_logo
By

नसरापूर, ता.१५ : ''''नसरापूरसारख्या मोठ्या गावात कचरा प्रश्न वाढून चालणार नाही. यासाठी पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी तातडीने कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व या समस्येबाबत मार्ग काढावा,'''' असे मत भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी व्यक्त केले व नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला.

नसरापूर (ता. भोर) येथे १५ व्या वित्त आयोगामधून होत असलेली कामे तसेच प्रलंबीत कामांचा व ग्रामपंचायतीची कर वसुली, सुरू असलेल्या योजना व आदी विकास कामे याचा आढावा घेण्यासाठी धनवाडे व वरिष्ठ लिपिक पंकज निकम यांनी नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी तेथे उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप कदम, सदस्य नामदेव चव्हाण, ग्रामसेवक विजय कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.

कराच्या थकबाकीबाबत लोकअदालतीमध्ये १३ लाखांच्या झालेल्या वसुलीची माहिती घेऊन थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचना धनवडे यांनी दिल्या. नसरापूर येथील इंदिरा गृहरचना संस्थेच्या सांडपाण्याच्या बाबत होणाऱ्या अडचणीचीही माहिती प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी घेतली.
यावेळी उपसरपंच संदीप कदम यांनी स्वप्नलोक सोसायटीपासून असलेल्या जुन्या गटाराचे काम करण्याचा ग्रामसभेत ठराव झाला असून, त्यानुसार कार्यवाही करणार असल्याची माहिती दिली. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना याबाबत तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या.