रिंगरोड भुसंपादनाविरोधात शिवरे येथे आज आंदोलन
रिंगरोड भुसंपादना विरोधात शिवरे येथे आज आंदोलन

रिंगरोड भुसंपादनाविरोधात शिवरे येथे आज आंदोलन रिंगरोड भुसंपादना विरोधात शिवरे येथे आज आंदोलन

Published on

नसरापूर, ता.८ : पुणे रिंगरोडच्या पूर्वीचा आराखडा बदलून शिवरे (ता. भोर) गावामधील सुमारे २२३ एकर बागायतीक्षेत्र संपादित करण्याच्या अधिसूचना नव्याने काढल्या आहेत. याच्या निषेधार्थ तसेच शिवरे गावच्या फाट्यावरील मंजूर उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवरे ग्रामस्थ रविवार (ता.९) पुणे-सातारा महामार्गावर गोठ्यातील जनावरांसह रास्ता रोको आंदोलन करत आहेत.
नव्याने काढलेल्या अधिसुचनेत शिवरे येथील तब्बल २२३ एकर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचा आरोप करत जाणीवपूर्वक जुने संपादन बदलून नव्याने संपादन केले जाणार आहे. यामुळे शिवरे गावावर अन्याय केला जात असल्याचा आरोप शिवरे ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हाधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी ,मंत्री व राजकीय पदाधिकारी यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. याबाबत गावावरचा अन्याय दूर करण्याची विनंती केली आहे परंतु त्यास कोणताही प्रतिसाद नसल्याने शेवटी ग्रामस्थ रास्तारोको आंदोलनाच्या निर्णयावर आले आहेत.

याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल डिंबळे यांनी सांगितले कि, या अगोदर देखिल शिवरे गावामधून महामार्गासाठी, बोरमाळ-बनेश्वर रस्त्यासाठी, हाय व्होल्टेज टाँवर लाइनसाठी जमिनीचे संपादन झाले आहे. आताचा रिंगरोड डोंगरी व जिरायती जमिनीमधून जात होता. त्याची शासकीय प्रक्रीया देखील पूर्ण झाली होती तो आराखडा बदलून नव्याने आराखडा करत शिवरे गावामधील सुमारे २२३ एकर बागायती जमीन संपादित करण्याचा घाट घातला जात आहे.
दरम्यान, यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.