नसरापूर येथे दुचाकी चोऱ्यांमध्ये वाढ

नसरापूर येथे दुचाकी चोऱ्यांमध्ये वाढ

Published on

नसरापूर, ता. १० : येथील मुख्य बाजारपेठ व रहिवासी सोसायट्यांमधून वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा दिवसात तीन दुचाकींची चोरी झाली असून, अद्याप तपास लागला नाही.


बनेश्वर पॅराडाईज या सोसायटीमधून रविवारी (ता. ९) बबन बाळासो तेंडुलकर यांची पार्किंगमध्ये लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (क्र. एम. एच. १२ जी. एल. ६०३७) ही चोरट्यांनी चोरी केली. या बाबत तेंडुलकर यांनी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी सोमवारी (ता. ३) नसरापूर येथील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरून सूर्यवंशी हाॅस्पिटल समोर लावलेली चांगदेव खंडोबा पवार (रा. केळवडे) यांची हिरो होंडा डीलक्स दुचाकी (एम. एच. १२ ई. पी. ५८४६) ही दुचाकी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली. तर त्या अगोदर गुरूवारी (ता. २९) नसरापूर येथील स्वप्नलोक सोसायटीच्या बिल्डींग क्र.५ च्या पार्किंग मधून महेंद्र रामचंद्र शेटे यांची नवीनच घेतलेली हिरो होंडा दुचाकी (एम. एच. १२ यु.पी. ८९३१) दुचाकी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यासर्व घटनांबाबत राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस तपास चालु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.