हिंगे वाठार, टापरेवाडीत
कृषिपंपांसह तारांची चोरी

हिंगे वाठार, टापरेवाडीत कृषिपंपांसह तारांची चोरी

नसरापूर, ता. २१ : भोर तालुक्यातील टापरेवाडी व हिंगे वाठार या गावांमधील तब्बल २८ शेतकऱ्यांच्या विजेचे कृषिपंप व त्यांच्या तांब्याच्या पट्टी केबलची चोरी झाली.
याबाबत शेतकऱ्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी (ता. १७) सायंकाळी ६ ते शुक्रवारी (ता. १८) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान या इलेक्ट्रीक मोटार व तांब्याच्या पट्टी केबलची चोरी झाली. याबाबत मुख्य तक्रार दत्तात्रेय मानसिंग पवार (रा. टापरेवाडी) यांनी दिली आहे. त्यामध्ये त्यांची ६ हजार ५०० रुपयांची इलेक्ट्रीक मोटर, ३०० मीटर तांब्याची केबल, टापरेवाडी येथील बापूराव भुजंग धुमाळ यांची ५ हजार रुपयांची मोटर, मुकुंद गोविंद टापरे यांची ५ हजार रुपयांची मोटर, या बरोबर रोहिणी मोहन टापरे, सुहास श्रीरंग यादव, दयानंद निवृत्ती टापरे, कृष्णा लक्ष्मण टापरे, वाठार हिंगे गावचे ज्ञानेश्वर श्रीपती शिवणकर, दिनकर पर्वती शिवणकर, विश्वास सुभेदार हिंगे, सुनील बाळकू हिंगे, संपत भिकोबा शिवणकर, लक्ष्मण गेनबा हिंगे, संतोष हनुमंत टापरे, संदीप बबन हिंगे, प्रकाश विठ्ठल गायकवाड, ज्ञानेश्वर नामदेव सोनवणे, विजय कृष्णा हिंगे, विक्रम विठ्ठल टापरे, नीलेश विठ्ठल टापरे, शरद विठ्ठल हिंगे, शिवाजी लंबाते, गोरख महादेव टापरे, हिंमत बाबासाहेब बोरगे, तुकाराम जयसिंग हिंगे, विलास जगन्नाथ हिंगे, नानासाहेब तुळशीराम हिंगे, उत्तम संपत सावंत, संपत शंकर हिंगे या सर्वांच्या प्रत्येकी ३०० मीटरच्या मोटरच्या तांब्याच्या पट्टी केबल (सर्वांची अंदाजे किंमत २५ हजार ५००) रुपये चोरीस गेल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com