रस्ता पार करताना तरुणीचा मृत्यू

रस्ता पार करताना तरुणीचा मृत्यू

नसरापूर, ता. ३ : पुणे-सातारा महामार्गावर धांगवडी (ता. भोर) गावच्या हद्दीत रस्ता ओलांडत असताना मोटार सायकलने दिलेल्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सफीना बेगम (वय २०) असे अपघातात मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत रहीस अनिस मोहम्मद (वय २९, रा. शिरवळ, ता. भोर, मुळ रा. सतना, मध्य प्रदेश) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धांगवडी (ता. भोर) गावात चालू असलेल्या बांधकाम साईटवरून काम संपवून रविवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजता शिरवळ येथे घरी जाण्यासाठी रस्ता पार करून पलीकडे जात असताना धांगवडी गावच्या हद्दीत महामार्गावर राजगड कॉलेजच्या थांब्यासमोर मोटार सायकलने (एम एच १२ एल ई ०१४८) दिलेल्या घडकेत सफीना बेगम ही तरुणी गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडली.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवला. या अपघातात मृत पावलेल्या तरुणीच्या मृत्यूस मोटार सायकल चालक जबाबदार असल्याची तक्रार रहीस मोहम्मद यांनी दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस अंमलदार खेंगरे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com