

खेड शिवापूर, ता. १८ : खेड शिवापूर- सासवड रस्त्यावर कासुर्डी गावच्या हद्दीत दोघांनी पोलिस असल्याचा बहाणा करत ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन व दोन अंगठ्या लंपास केल्याची घटना राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग घडत आहे. या चोरट्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान राजगड पोलिसांसमोर आहे.
रामदास मारुती जगदाळे (वय ६०, रा. गराडे- मठवाडी, ता. पुरंदर) यांची फसवणूक झाली आहे. सोमवारी (ता. १७) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जगदाळे हे कासुर्डी मार्गे मरिआई घाट मार्गे गराडे गावाकडे जात असताना कासुर्डी गावच्या हद्दीत पुलाच्या अलीकडे आंब्याच्या झाडाजवळ दोन व्यक्तींनी जगदाळे यांना अडवून, ‘आम्ही पोलिस आहोत, पुढे चेकिंग चालु आहे. तुमचे दागिने रुमालात बांधून खिशात ठेवा,’ असे सांगत विश्वास संपादन करून जगदाळे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन व पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या रुमालात बांधण्याचा बहाणा करून दागिने स्वतःकडे ठेवून घेऊन फसवणूक करून निघून गेले. दागिने लंपास केले असल्याचे काही वेळाने जगदाळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी परिसरात त्या चोरट्यांचा शोध घेतला, परंतु मिळून आले नाहीत. त्यानंतर त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
याबाबत पोलिस हवालदार महेश खरात पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.