भोरमध्ये एमआयडीसी होणारच : शिवतरे

भोरमध्ये एमआयडीसी होणारच : शिवतरे
Published on

नसरापूर, ता.४ : ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाच्या संकल्पात भोर एमआयडीसीचा मुद्दा प्राधान्याने घेतला आहे. भोर तालुक्याच्या विकासाला चालना देणारा उत्रौली एमआयडीसी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही. विभागीय कार्यालयाकडून भोरमधील क्षेत्र वगळण्याचा वरिष्ठ कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर होणार नाही,’’ असा ठाम विश्वास
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी व्यक्त केला.

एमआयडीसी प्रकल्पाबाबत भोर येथे मंगळवारी (ता.४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिग्रहित केलेले क्षेत्र वगळण्याचा निर्णय घेऊन, पुणे विभागीय कार्यालयाने तसा प्रस्ताव २०२२ मध्येच वरिष्ठ कार्यालयाला पाठवला असल्याबाबत सोमवारी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झालेल्या होते. यामुळे उत्रौलीचे नागरिक, भोरमधील राष्ट्रवादीचे नेते शिवतरे व चंद्रकांत बाठे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना शिवतरे यांनी सांगितले की, भोर तालुक्याच्या विकासासाठी सन १९९२ मध्ये उत्रौली वडगाव एमआयडीसीसाठी नापिक जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. सन २००८ पासून मी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे. येथील तरुणांना रोजगार मिळावा, येथील विस्थापित होणारे नागरिक थांबावेत, यासाठी एमआयडीसी व्हावी हीच आमची भूमिका आहे. हा प्रकल्प रद्द करण्याच्या प्रस्तावानंतर संबंधित प्रकल्प अधिकारी, उद्योगमंत्री, यांच्याबरोबर निवडणुकी अगोदर वारंवार बैठका घेऊन आमची भूमिका मांडली होती. निवडणुकीनंतर देखील विद्यमान आमदार शंकर मांडेकर, अजित पवार यांच्या बरोबर आम्ही बैठक घेऊन उत्रौली एमआयडीसी व्हावी यासाठी सतत प्रयत्न केले. आजही ती जमीन माळरान आहे. तेथील शेतकऱ्यांना शासनाच्या भूसंपादन कायद्यानुसार चांगला मोबदला मिळावा व तिथे उद्योग व्यवसाय व्हावा ही आमची भूमिका कायम आहे. सातबारा उतारे कोरे करण्यासाठी आमचा विरोध आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी देखील या अधिवेशन काळात संबंधित विभागाची बैठक घेणार शिवतरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com