नैसर्गिक कृषीपर्यटनातून निरोगी शेतीचा संदेश
नसरापूर, ता. ९ : नसरापूर (ता. भोर) येथील चैत्राली कृष्णा फडतरे यांनी पारंपरिक शेतीचा साचा मोडीत काढला. आपल्या ३५ एकर शेतजमिनीतला महत्त्वपूर्ण भाग नैसर्गिक शेतीत परिवर्तित केला आहे. त्यांनी आपल्या शेताला कृषी पर्यटन केंद्र बनविले व त्यायोगे देश विदेशातील पर्यटकांना नैसर्गिक शेतीचे सौंदर्य दाखवून दिले व व्यवहार्यतेबद्दल शिक्षित करत निरोगी शेतीचा संदेश दिला.
चैत्राली फडतरे यांनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे रासायनिक शेती केली. त्यासाठी लागणारा अधिकचा खर्च, मातीचा होणारा निकृष्ट दर्जा आणि आरोग्याचे धोके हे या प्रक्रियेचा भाग बनले होते. त्यांच्या शेतातील कामगारांना रासायनिक फवारण्यांमधून पुरळ आणि तो विषारी वायू श्वासातून आत जाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. ज्यामुळे शेती हा एक धोकादायक व्यवसाय बनला होता. या दरम्यान त्यांना आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या भेट झाली व शेती विषयीचा दृष्टिकोन बदलला.
आर्ट ऑफ लिव्हिंगमुळे टर्निंग पॉइंट
चैत्राली फडतरे यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री शेतकरी मंचकडून नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकून घेतले. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी आनंदी, आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि निरोगी शेतकरी समुदायासाठी मार्गदर्शन केले आहे. यामध्येच त्यांना जाणवले की एक देशी गाय २० एकरपर्यंत शेतजमीन सुपीक करू शकते, ज्यामुळे शेतीखर्चात कमालीची घट होते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.त्याप्रमाणे शेतीत परिवर्तन केले.
फडतरे कुटुंबीयांची प्रगतशील शेती करण्याची पध्दत पाहून त्यांच्या शेतावर स्मायली वाँटर मॅनेजमेंट इक्विपमेंट कंपनीचे प्रकाश किरण पवार यांनी त्यांच्या देशातील पहिल्या ‘शेतीतील पिकाला त्याच्या गरजेनुसार, हवामानानुसार पाणी देणाऱ्या इक्विपमेंटची’ चाचणी सुरू केली आहे.
नैसर्गिक शेतीमुळे घडले परिवर्तन
१. रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरणे बंद केले
२. जीवामृत (शेण आणि मूत्रापासून आंबवून बनवलेले जैव-खत) वापरले
३. मल्चिंग आणि आंतरपीक तंत्राचा उपयोग केला.
४. शेतीसाठी लागणारा खर्च कमी झाला ज्यामुळे प्रतिएकर नफा वाढला.
५ अर्धा एकर जमीन एक लाख रुपये नफा कमावते आहे.
६. गमावलेली सुपीकता येऊन जमिनीने नैसर्गिकरित्या श्वास घेतला
रसायनमुक्त पिके
* कोथिंबीर
* टोमॅटो
* पालक
* लौकी
* कारले
जर्मनी, अमेरिकेतील पर्यटकांची शेतीला भेट
कुटुंबीयांनी आपण करत असलेल्या नैसर्गिक शेतीचा लाभ सर्वांना व्हावा त्यामधून व्यवसाय वाढावा नैसर्गिक शेती बद्दल जागृकता वाढावी यासाठी या शेतीला जोड कृषी पर्यटन सुरू केले. डिजीटल समाजमाध्यमावर त्यांची जाहिरात केल्याने फक्त पुणे जिल्हाच नाही तर राज्याबाहेरून तसेच जर्मनी, अमेरिका आदी देशांमधून देखील पर्यटक या ठिकाणी भेट देऊन नैसर्गिक शेती उत्पादनाचा अस्वादाबरोबर पर्यटनाचा आनंद घेत आहेत
ठिकाणी कृषी पर्यटनात
- ताज्या पदार्थांपासून बनवलेल्या पारंपरिक स्नॅक्ससह स्वागत
- शेतातील एक मार्गदर्शित फेरफटकयामध्ये पाहुण्यांना नैसर्गिक आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारच्या शेतीचे दर्शन
- शेजारील बनेश्वर मंदिराला भेट देऊन भूमीशी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाते दाखवले जाते.
देशभरातील १५०-३०० पर्यटक नैसर्गिक शेताला भेट देतात. शाळकरी मुले सहलीचा ‘शेत शिवार फेरी’चा आनंद घेतात. शाश्वत शेतीबद्दल मजेशीरपणे शिकतात. नैसर्गिक शेतीमुळे नफा आणि शाश्वती एकत्रच लाभू शकते आरोग्य निरोगी तसेच अधिक समृद्ध शेतीच्या भविष्याकडे वाटचाल करत आहे.
- चैत्राली फडतरे, शेतकरी
05181
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

