प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

Published on

नसरापूर, ता. १० : सारोळा (ता. भोर) येथील नीरा नदी पात्रात हातपाय बांधून पोत्यात भरलेला मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या १२ तासांत राजगड पोलिसांनी मृताची ओळख पटवली. तसेच, त्यास त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने गळा दाबून मारुन पोत्यात भरून पाण्यात टाकल्याचा तपास केला. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरास अटक केली आहे.
सिद्धेश्‍वर भिसे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी त्याची पत्नी योगिता (वय ३०) हिला पुणे येथून, तर तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार (वय ३२) यास धाराशिव जिल्ह्यातून गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत अटक केली.
राजगड पोलिसांना रविवारी दुपारी नीरा नदीच्या पाण्यात मृतदेह मिळाला. याबाबत सायंकाळी गुन्हा दाखल केला. मृतदेहाच्या हातावर गोंदवलेल्या ‘ओम’ या शब्दावरून या वर्णनाचे कोणी बेपत्ता आहे काय, याबाबत पुणे शहर व जिल्ह्याच्या पोलिस ठाण्यांना संदेश देण्यात आला होता. त्यावेळी ससाणेनगर येथील अशा वर्णनाची एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यावर अधिक तपास केला असता मृत व्यक्ती नाव सिद्धेश्वर असून त्याची पत्नी योगिता हिनेच ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. राजगड पोलिसांनी पत्नी योगिता हिच्याकडे अधिक चौकशी करत असताना तिच्याबद्दल संशय आला. त्यावर तिला ताब्यात घेतल्यावर तिनेच प्रियकराच्या मदतीने सिद्धेश्वर यांचा खून केल्याचे कबूल केले.
सिद्धेश्वर याची पत्नी योगिता व तिचा माहेरचा मित्र शिवाजी सुतार यांचे लग्नाअगोदरपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतर देखिल ते भेटत असल्याचे निदर्शनास आल्यावर सिद्धेश्वर हा काही महिन्यांपूर्वी ससाणे नगर येथे कुटुंबासह वास्तव्यास आला होता. पुणे येथे तो पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून कामास राहिला होता. मात्र, पुण्यामध्ये आल्यावरही शिवाजी सुतार हा योगिता हिला भेटण्यासाठी गावावरून येत होता. त्यांच्या दोघांच्या अनैतिक संबंधात सिद्धेश्वर अडचण ठरत होता. त्यामुळे सोमवारी (ता. ३) दोन वाजण्याच्या सुमारास योगिता व तिचा प्रियकर शिवाजी सुतार या दोघांनी गळा दाबून सिद्धेश्वर याचा खून केला. त्यानंतर हातपाय बांधून प्लास्टिक पोत्यात भरून स्कूटरवर ठेवून ससाणेनगर येथून पुणे- सातारा महामार्गावरून आणून सारोळा येथील नीरा नदीच्या पुलावरून पाण्यात टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com