

खेड शिवापूर, ता.१२ : शिंदेवाडी ते वेळू गावचा (ता. भोर) गेले अनेक वर्षांपासून बंद असलेला शिवकालीन पाणंद रस्ता महसूल विभागाच्या प्रयत्नाने खुला करण्यात आला. यामुळे परिसराच्या विकासास चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले आहे.
शिंदेवाडी गोगलवाडी व वेळू गावचे हद्दीतून जाणारा पाणंद रस्ता या परिसरातील काही शेतकऱ्यांच्या हद्दीच्या वादातून अनेक वर्षांपासून बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना डोक्यावर शेतमाल वाहतूक करून बाजारपेठेत आणावा लागत होता. यांत्रिक अवजारे जाण्यासाठी इतर शेतकऱ्यांची परवानगी घेऊन शेतात ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रे नेली जात होती. या अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांची येथील पाणंद रस्ता खुला करण्याची मागणी महसूल विभागाकडे केली होती.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य अमोल पांगारे, वेळूचे सरपंच सुरेश पांगारे, शिंदेवाडीचे सरपंच माजी सरपंच अरविंद शिंदे, ईश्वर पांगारे, गणेश वाडकर, निखिल वाडकर, मंगेश सुर्वे, चेतन पांगारे, दत्तात्रेय पांगारे, लक्ष्मण काळे, भाऊसाहेब वाडकर, बंडू शिंदे, शेतकरी संदीप पांगारे, राहुल पांगारे, मारुती गोगावले आदी उपस्थित होते.
पाणंद रस्ता हा सर्वांच्या हिताचा असतो. काही गैरसमजुतीने व हद्दीच्या वादातून बंद झालेला रस्ता येथील शेतकऱ्यांनी सामोपचाराने मार्ग काढून खुला करण्यास सहकार्य केले. या बद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार मानते.
- प्रभावती कोरे, मंडलाधिकारी, ता. भोर
महसुल विभागाकडून हद्दीच्या वादात समेट
पुणे जिल्हाधिकारी यांनी देखील पाणंद रस्ते खुले करण्यासंदर्भात आदेश काढले असल्याने व तहसीलदारांच्या सूचनेनुसार वेळूच्या मंडलाधिकारी प्रभावती कोरे, तलाठी रवींद्र काळे व इतर महसूल कर्मचारी यांनी पुढाकार घेत या पाणंद रस्ता परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेतली व पाणंद रस्त्याची अडचण सोडविली. हद्दी संदर्भातील वादामध्ये समेट घडवून हा रस्ता खुला केला. लगेचच त्या रस्त्याची दुरुस्ती व मुरुमीकरणही करण्यात आले. या मुळे शिंदेवाडी गोगलवाडी व वेळू परिसरासाठी एक चांगला पर्यायी रस्ता तयार झाला आहे.
05193
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.